ऑनलाइन लोकमतपरभणी, दि. - लग्नाहून गावाकडे परतत असताना वऱ्हाडाची जीप उलटून चार जण ठार तर सहा जण जखमी झाल्याची घटना सेलू तालुक्यातील चिकलठाणा परिसरात १८ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली़सेलू तालुक्यातील रायपूर येथील लग्नसमारंभासाठी जालना जिल्ह्यातील वाटुरफाटा येथील वऱ्हाडी एम़एच़२१-व्ही़७३६४ या जीपने आले होते़ लग्न लावून वऱ्हाडी मंडळी पुन्हा गावाकडे जाण्यासाठी जीपमधून निघाले होते़ एम़एच़२१-व्ही़७३६४ ही जीप सेलू तालुक्यातील चिकलठाणा पाटी परिसरात आली असता जीपवरचा चालकाचा ताबा सुटल्याने ती उलटली. यामुळे झालेल्या अपघातात मंठा येथील कल्याण श्रीराम बादल (ईदलापूर), भीमराव नभाजी शिंंदे, शरद बालासाहेब रोहिणकर, गीताराम वायाळ (तिघेही रा़ वाटूर) हे जागीच ठार झाले़ तर आकाश राजेंद्र पांचाळ, रमेश गणपत खवणे, भानुदास अंबादास भगस, रामा गणेश कुऱ्हे, आप्पाराव कुंडलिकराव वायाळ, अच्युत दादाराव भगस हे गंभीर जखमी झाले. त्यातील आकाश पांचाळ, रमेश खवणे व भानुदास भगस यांना मंठा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर रामा गणेश कुऱ्हे व आप्पाराव कुंडलिकराव वायाळ आणि अच्युत दादाराव भगस यांना सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले़ त्यातील रामा कुऱ्हे व आप्पाराव वायाळ यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने जालना येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले़ आप्पाराव वायाळ हे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे मामा आहेत़ दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी महामार्ग पोलिस व चारठाणा आणि सेलू पोलिस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले़ जखमींना दवाखान्यात हलविण्यासाठी प्रवासी व इतरांनी मदत केली़
जीप उलटून ४ जण ठार; ६ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2017 7:34 PM