शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

प्रकल्पग्रस्तांना चार महिन्यात नागरी सुविधा

By admin | Published: December 23, 2015 11:30 PM

वीर बाजी पासलकर प्रकल्प व पानशेत प्रकल्पांतर्गत खडकवासला, पानशेत वरसगाव या प्रकल्प बाधित धरणग्रस्तांचे पुनर्वसन हवेली व दौंड तालुक्यात करण्यात आले आहे.

नागपूर : वीर बाजी पासलकर प्रकल्प व पानशेत प्रकल्पांतर्गत खडकवासला, पानशेत वरसगाव या प्रकल्प बाधित धरणग्रस्तांचे पुनर्वसन हवेली व दौंड तालुक्यात करण्यात आले आहे. यातील २७ ठिकाणी नागरी सुविधा देणे शिल्लक आहेत. यासाठी १३९ कोटीची तरतूद करण्यात आली असून येत्या चार महिन्यात या ठिकाणी नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे आश्वासन मदत व पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत दिले.राहुल कुल यांनी लक्षवेधी सूचनेदरम्यान उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खडसे बोलत होते. खडसे यांनी सांगितले की, वीर बाजी पासलकर प्रकल्पातील २०९४ प्रकल्पग्रस्तांपैकी २०५६ प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन वाटप केले असून ३८ प्रकल्पग्रस्त शिल्लक आहेत. पानशेत प्रकल्पातील १३०२ प्रकल्पग्रस्तापैकी १२९८ प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन वाटप केली असून केवळ ४ प्रकल्पग्रस्त शिल्लक असून उर्वरित प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यास शासन कटिबद्ध आहे. दोन्ही प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना १२७२.२८ हेक्टर वनजमीन वाटप करण्यात आली आहे. या जमिनीपैकी काही क्षेत्राचे निर्वनीकरण झालेले असून ज्या क्षेत्राचे निर्वनीकरण अद्याप झाले नाही, त्या क्षेत्राची माहिती संकलित करून निर्वनीकरणाचा एकत्रित प्रस्ताव वन विभागाकडे पाठविण्यात येईल, असेही खडसे यांनी यावेळी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य शशिकांत शिंदे यांनीही सहभाग घेतला. (प्रतिनिधी)