शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

दोन हजारांत चौघांना अडीच महिने राबवले; कातकरी कुटुंबाची पिळवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 8:10 AM

मालकावर गुन्हा दाखल, खदानीत काम करत असताना  मालकाकडून जबरदस्तीने  अवजड कामे करून घेतली जात. कामे न केल्यास शिवीगाळ वा दमदाटी केली जात असे.

रवींद्र साळवे मोखाडा : रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या कुटुंबातील चार व्यक्तींना दोन हजार रुपयांत  अडीच महिने राबविणाऱ्या व कातकरी कुटुंबाची पिळवणूक करणाऱ्या  खदान मालकावर वेठबिगारी कायद्यांतर्गत मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मोखाडा तालुक्यातील पळसुंडा येथील महादू मुकणे (वय ६०), पत्नी लक्ष्मीबाई (वय ५५), मुलगा गणेश (वय १५) व मुलगी सविता (वय १२) हे कुटुंब जून महिन्यात  गणेशवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर येथे दगडखाणीच्या कामाला स्थलांतरित झाले होते. यावेळी एक ट्रॅक्टर दगड भरण्यासाठी ५०० रुपये मजुरी देण्याचे ठरले होते. परंतु खदान मालकाने त्यांच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन या कातकरी कुटुंबाची पिळवणूक करून फसवणूक केल्याचा आरोप या पीडित कुटुंबाने केला आहे.

खदानीत काम करत असताना  मालकाकडून जबरदस्तीने  अवजड कामे करून घेतली जात. कामे न केल्यास शिवीगाळ वा दमदाटी केली जात असे. तसेच दोन ते अडीच महिने काम करूनही त्यांना कामाचा मोबदलादेखील दिला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दोन हजाराच्या दिलेल्या आगाऊ रकमेत चार व्यक्तींना अडीच महिने राबवून घेतले. यामुळे  मालकाच्या पिळवणुकीला कंटाळून अखेर १४ तारखेला काम सोडून घरी जाण्याचा निर्णय या कुटुंबाने घेतला. परंतु भाड्याला पैसे नसल्याने महादू मुकणे हे तिथूनच पायी-पायी निघाले. थोडीफार शिल्लक असलेल्या गंजीपुंजीतून गणेश, सविता व त्यांची आई लक्ष्मीबाई कसेबसे गाडीभाडे करून त्यांनी त्र्यंबकेश्वर गाठले व तेथून पायी येत असताना दुपारी १२.३० च्या दरम्यान त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेहर्षजवळ नवसू गारे, संतोष झिंजुर्डे, लक्षण खाडे, राजू पालवे या श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास येताच संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या वाहनाने मोखाडा पोलीस ठाण्यात दाखल केले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष  विवेक पंडित यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन संघटनेच्या  पुढाकाराने  वेठबिगारीचा गुन्हा दाखल केला.

एकीकडे संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव साजरा होत असून त्याचबरोबर देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदावर आदिवासी समाजाच्या महिला विराजमान झाल्या आहेत. परंतु दुसरीकडे आदिवासी समाजातील आदिम  अनेक कातकरी कुटुंबे वेठबिगारीच्या पाशात अडकली आहेत. अशा शेकडो  कुटुंबांकडे शेती नाही, घर नाही. शासकीय कागदपत्रे नाहीत. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही या पीडित कुटुंबांनी मतदानाचा हक्क बजावलेला नाही. याला जबाबदार कोण? - विवेक पंडित, श्रमजीवी संघटना