ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. 1 - वर्धा जिल्ह्यातील महाकाळी धरणात चार जण बुडाले आहेत. यात तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. शनिवारी (1 जुलै) दुपारी ही दुर्दैवी घटना घडली आहे. गौरव गुल्हाणे, श्वेता नेहारे, शीतल प्रधान आणि सोनल नाईक अशी बुडालेल्यांची नावं आहेत.
एकूण 8 जण दुपारी 3.30 वाजण्याच्या दरम्यान धरणावर गेले होते. सर्व जण धरणाच्या पायथ्याशी गेले होते. यावेळी श्वेता पाण्यात उतरली. यावेळी तिचा पाय घसरला त्यावेळी तिला मदतीसाठी हात देणारे अन्य दोन जणीही बुडाले. या तिघींच्या मदतीसाठी धावलेला गौरवही धरणात बुडाला.
घटनास्थळी ठाणेदार विनोद चौधरी व अन्य पोलीस सहकारी दाखल झाले असून बुडालेल्यांचा शोध सुरू आहे. आपत्ती व्यवस्थापनाकडे पोलीस स्टेशनने मदत मागितली पण ती पथक अमरावतीला गेले असल्याचे कारण सांगण्यात आले. यामुळे मदना धरणावरुन मदत साहित्य बोलावण्यात आले असुन भोई बांधव व ग्रामस्थ बेपत्तांचा शोध घेत आहे.