शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सांगलीत फरशी घेऊन जाणारा ट्रक उलटला; फरशीखाली सापडून दहा मजुरांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2017 7:12 AM

सांगलीमध्ये ट्रकच्या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाल्याचं समजतं आहे.

सांगली- सांगलीतील माणेराजुरीजवळ फरशी घेऊन जाणारा ट्रक उलटून अपघात झाला. या अपघातात दहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात ट्रकमधील 32 व्यक्तींपैकी 10 व्यक्ती जागेवरच ठार झाल्या. तर 22 जखमी आहेत. पैकी 11 जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे आणि उर्वरित 11 जखमींवर ग्रामीण रुग्णालय, तासगाव येथे उपचार सुरु आहेत. 

अपघातानंतर तासगाव, भोसे, हातनूर आणि पलूस येथील 108 क्रमांकांच्या 4 रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि उपचार सुरु करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात आली. तसेच, लोकप्रतिनिधी व विजापूरचे जिल्हाधिकारी शिवकुमार यांना घटनेची माहिती देण्यात येऊन सिंदगी व अन्य तालुक्यातील जखमींबाबत कल्पना देण्यात आली आहे.

शनिवारी पहाटे दोन ते तीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघात झालेला ट्रक कर्नाटकातून येत असल्याची माहिती मिळते आहे. एसटी बंद असल्याने कर्नाटकातून कराडमध्ये मजुरी करायला मजूर या ट्रकने प्रवास करत होते. त्यावेळी तासगाव- कवठेमहांकाळ मार्गावर योगेवाडीजवळ ट्रक चालकाचं नियंत्रण सुटून अपघात झाला आहे. 

उपजिल्हाधिकारी मिनाज मुल्ला, मिरज तहसीलदार शरद पाटील, कवठेमहांकाळ तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्यासह महसुल यंत्रणेला मदतकार्यासाठी तात्काळ पाठवण्यात आले आहे. तसेच, विजापूर महसुल यंत्रणेचीही एक टीम सांगलीच्या दिशेने रवाना झाली आहे. पोलीस आणि वैद्यकीय विभागास पुढील आवश्यक आणि कायदेशीर कार्यवाहीसाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

एसटी संपामुळे सिंधगीहुन कराडकडे मजूर फरशी वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून निघाले होते. माणेराजुरी नजीक गर्द धुक्यामुळे ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती कळताच स्थानिक ग्रामस्थ मदतीला धावले. यावेळी जखमींना तात्काळ स्थानिक रुग्णालयामध्ये हलवण्यात आले तर जेसीबीच्या साहाय्याने ट्रक खाली चिरडलेले मृतदेह बाहेर काढणेचे काम सुरू आहे.

मृत व्यक्तीपैकी सहा व्यक्तींची ओळख पटली असून त्यापैकी दोघांची नावे संगमा सिदाप्पा भिमसे (वय 60), रा. मंगळूर, ता. सिंदगी आणि श्रीमत गुलालप्पा गौड (वय 50) रा. कनमेश्वर, त जेउरगी, ( दोन्ही जि. विजापूर) अशी आहेत. 

जखमींची नावे पुढीलप्रमाणेइंदूबाई शामराव निंबाळकर (वय 30), रा. शहाबाद जि. गुलबर्गा, परशुराम यल्लप्पा पुजारी (वय 25), रा. तालिकोट, जि. विजापुर, बसम्मा यलाप्पा पुजारी (वय 45), रा. पेरापुर, जि. बेळगाव, रुपेश शिवाजी राठोड (वय 27), रा. मुनकोळ जि गुलबर्गा, संतोष महादेव मंजुळे रा. शहाबाद जि गुलबर्गा, अशोक रेवाप्पा बिरादार (वय 50), लक्ष्मीबाई लक्ष्मण मादार (वय 30), रा. शिंदगी जि विजापूर, लक्ष्मण प्रभू मादार (वय 40) रा शिंदगी, बेबी समिरहुसेन शेख (वय 45), रा. शहापूर जि गुलबर्गा, साहेबअण्णा महादप्पा ज्ञानमंत (वय 65) रा. अंकलबा, जि गुलबर्गा, नागाप्पा शामराव निंबाळकर (वय 8) रा. शहाबाद. 

टॅग्स :Accidentअपघात