परभणी : केबीसी गुंतवणूक प्रकरणी अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या मुख्य आरोपी भाऊसाहेब चव्हाण याच्यासह अन्य तीन आरोपींना १३ जून रोजी परभणी येथील न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे़ दुसऱ्या एका प्रकरणात या चारही आरोपींना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या ताब्यात देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. केबीसी कंपनीमार्फत रक्कम गुंतवणूक केल्यास दुप्पट, तिप्पट रक्कमेचा परतावा देण्याचे आमिष दाखवून परभणी जिल्ह्यात अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली. जिल्ह्यात फसवणुकीचा आकडा ८० ते ९० कोटी रुपयांच्या घरात आहे़ त्याची परतफेड झाली नसल्याने जिल्ह्यात ‘केबीसी’चे संचालक भाऊसाहेब चव्हाण याच्यासह अन्य आरोपींविरूद्ध विविध ११ गुन्हे दाखल झाले आहेत़ या ११ गुन्ह्यांपैकी ७ गुन्ह्यांचा तपास केंद्रीय गुन्हा अन्वषेण विभाग आणि चार गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेमार्फत केला जात आहे़ (प्रतिनिधी)
चव्हाणसह चौघांना न्यायालयीन कोठडी
By admin | Published: June 14, 2016 3:09 AM