शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
3
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
4
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
5
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
7
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
8
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
9
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
10
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
11
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
12
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
13
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
14
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
16
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
17
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
18
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
19
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
20
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी

पेट्रोल पंपावरील दरोड्यातील आरोपींच्या शोधासाठी चार पथके

By admin | Published: January 17, 2017 6:56 PM

ऑनलाइन लोकमत लातूर,दि. 17 -  लातूर-बार्शी रस्त्यावरील साखरा पाटीनजिक हिरेमठ पेट्रोल पंपावर सोमवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास अज्ञात तिघांनी ...

ऑनलाइन लोकमत

लातूर,दि. 17 -  लातूर-बार्शी रस्त्यावरील साखरा पाटीनजिक हिरेमठ पेट्रोल पंपावर सोमवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास अज्ञात तिघांनी सशस्त्र दरोडा टाकला. या प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड यांनी चार पथकांची नियुक्ती केली आहे. घटनास्थळापासून काही अंतरावर गुन्ह्यातील दुचाकी आणि चोरट्यांनी बदललेले कपडे पोलिसांनी जप्त केले आहेत.

सोमवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास हिरेमठ पेट्रोल पंपावर तिघा अज्ञात दरोडेखोरांनी चेहऱ्याला स्कार्फ बांधून टाकलेल्या सशस्त्र दरोड्यात तब्बल सव्वालाख रुपयांपेक्षा अधिक मुद्देमाल लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी गातेगाव पोलीस ठाण्यात पंपावरील कर्मचारी विनोद रामसिंग ठाकूर (३५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात तिघांविरोधात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि. पडवळ आणि सपोनि. दीपरत्न गायकवाड यांचे पथक तर गातेगाव पोलिसांचे आणि उपविभागीय अधिकारी राजेंद्र उनवणे यांच्या स्तरावर निर्माण करण्यात आलेली अशी एकूण चार पथके आरोपींच्या शोधासाठी नियुक्त करण्यात आली आहेत. ही चारही पथके वेगवेगळ्या दिशेने रवाना झाली आहेत.

याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. फरार झालेल्या दरोडेखोरांच्या अटकेसाठी तपास पथकांना विशेष सूचना केल्या आहेत. मंगळवारी सायंकाळपर्यंतही या चारही पोलीस पथकांच्या हाती कुठलाही सुगावा लागला नव्हता. दोन पथके उस्मानाबाद जिल्ह्यात आणि इतर दोन पथके बीड, सोलापूर जिल्ह्यात रवाना झाली आहेत.

दरोडा टाकतानाचे सीसीटीव्ही फूटेज-

https://www.dailymotion.com/video/x844ois