शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

४० कोटी खर्चून बांधणार चार हजार घरे

By admin | Published: May 16, 2016 5:08 AM

दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे व प्रतीक्षा यादीत असलेल्या चार हजार बेघर कुटुंबीयांना इंदिरा आवास योजनेतून घरकुले दिली जाणार आहे.

ठाणे : दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे व प्रतीक्षा यादीत असलेल्या चार हजार बेघर कुटुंबीयांना इंदिरा आवास योजनेतून घरकुले दिली जाणार आहे. त्यासाठी २०१६-१७ या आर्थिक वर्षात सुमारे ४० कोटी रुपयांचा निधी मिळणे अपेक्षित आहे. जिल्हा प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षात सुमारे चार हजार घरकुले बांधण्याचे नियोजन आहे. एका घरकुलास सुमारे १ लाख रुपये खर्च आहे. यानुसार, सुमारे ४० कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यातील या घरकुलांसाठी खर्च होणार आहे. मात्र, यासाठी सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षणातील नवीन दारिद्र्यरेषेची यादी प्रसिद्ध होणे गरजेचे आहे. या नव्या यादीतील सुमारे ४ हजार गरजू कुटुंबीयांना या घरकुलाचा लाभ देण्याचे नियोजन आहे. अन्यथा, जुन्या यादीतील कुटुंबीयांपैकी शिल्लक राहिलेली २ हजार घरकुलेही या वर्षी बांधावी लागणार आहेत. सामाजिक, आर्थिक जात सर्वेक्षणातील संपूर्ण त्रुटी पूर्ण केलेल्या आहेत. तसा अहवालही आता केंद्र शासनाकडे पाठवलेला आहे. त्यावर निर्णय होऊन नवीन दारिद्र्यरेषेची यादी लवकरच प्रसिद्ध होण्याची अपेक्षा जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. त्यानुसार, या वर्षात जाहीर केलेली अर्थसंकल्पीय तरतूद खर्च करावी लागणार आहे. अन्यथा, हा निधी रद्द होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.