शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

येवला-मनमाड रोडवर चार वाहनांचा विचित्र अपघात, 9 जणांचा मृत्यू तर 16 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2017 9:10 PM

येवला-मनमाड रोडवर चार वाहनांचा भीषण अपघात झाला असून यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे तर 16 जण गंभीर जखमी आहेत.

नाशिक, दि. 27 - येवला-मनमाड रोडवर चार वाहनांचा भीषण अपघात झाला असून यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे तर 16 जण गंभीर जखमी आहेत. मृतामध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. जखमींना अधिक उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले आहे. जखमींची अवस्था पाहता मृत्यूचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. एसटी बस, क्रुझर, मारुती ओम्नी व्हॅन आणि बाईक अशा चार वाहणांचा विचित्र असा अपघात झाला आहे. या अपघातात ठार झालेले प्रवासी धुळे येथील रहिवासी आहेत. अपघात इतका भीषण होता की गाडीतील मृतदेह अखेर दरवाजा तोडून काढावे लागले. स्थानिक संभाजीराजे पवार, दत्ता निकम, आणि  सावरगाव येथील पवार कुटुंबियांनी केवळ 15 मिनिटात मदत कार्य करीत अपघातग्रस्थानां  उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. 

येवला शहरापासून मनमाडच्या दिशेने बाभूळगाव शिवारातील निजधाम आश्रमासमोर रविवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास मनमाडकडून येवल्याकडे येणाऱ्या धुळे-पुणे या एसटी बसला (एम.एच.४०एन.९८२१) पल्सर मोटारसायकल (एम.एच.४१ ए.जे.२४८०) ओव्हरटेक करीत होती. त्याचवेळी येवल्याकडून मनमाडच्या दिशेने जाणारी क्रुझर (एमएच.२६ ए.एफ१४८७) जीपच्या उजव्या बाजूचा टायर फुटल्याने क्रुझर जीप पलटी होऊन मारुतीओम्नी व्हॅन ( एम.एच.१५ बी.एन. ६४६७ ) . या गाडीवर धडकली. क्रुझरचा वेग जास्त असल्याने क्रुझरसह मारुती ओम्नीव्हॅनचा चक्काचूर झाला.

अपघाताची तिव्रता एवढी होती कि अपघातस्थळी रक्ताचा सडा पडला होता तर मृतांचे अवयव विखुरले गेले होते. एसटी बसला किरकोळ नुकसान झाले. जखमींची संख्या जास्त असल्याने खाजगी डॉक्टरांनी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयामध्ये येऊन शासकीय वैद्यकिय अधिकाऱ्यांना उपचारासाठी मदत केली. क्रुझर गाडीतील अपघातग्रस्त धुळे भागातील असून ते कोळेपेवाडी येथुन साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपुन क्रुझरमधून धुळे येथे घरी परतत होते. क्रुझरमध्ये १५ ते १६ जण प्रवास करीत होते. ज्याचा साखरपुडा होता तो नवरदेव विजय गांगुर्डे रा. धुळे हा गाडीमध्ये जागा नसल्याने मित्राबरोबर मागून मोटारसायकलवर येत होता. अपघातातील काही जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांना अधिक उपचारार्थ नाशिक येथे हलवण्यात आले आहे.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिस