पुणे : सुफी तत्त्वज्ञानाचा सर्वंकष आढावा घेणारा ‘सुफी तत्त्वज्ञान : सखोल विश्लेषण’ हा ग्रंथ राज्य सरकारकडून वर्षभरात प्रसिद्ध केला जाणार आहे. अहमदनगरमधील ज्येष्ठ अभ्यासक डॉ. मुहम्मद आजम यांनी या ग्रंथाचे लेखन केले आहे.२००० पृष्ठसंख्या असलेल्या चार खंडांच्या या ग्रंथात सुफी तत्त्वज्ञानाच्या प्रारंभिक अवस्थेपासून ते विकास काळापर्यंतच्या दार्शनिक वैशिष्ट्यांचा सर्वंकष आढावा घेण्यात आला आहे. डॉ. आजम यांनी प्रकाशनाच्या अनुदानासाठी या ग्रंथाचा प्रस्ताव शासनाच्या अनुदान समितीकडे पाठविला होता त्याला हिरवा कंदील मिळाला असून वर्षभरात हा ग्रंथ शासनस्तरावर प्रसिद्ध केला जाणार आहे. (प्रतिनिधी)संत साहित्याचे अभ्यासक असलेले डॉ. मुहम्मद आजम यांचे सुफी तत्त्वज्ञानावरील चिंतन अत्यंत मौलिक आहे. वर्षभरात ग्रंथाचे चारही खंड प्रसिद्ध केले जातील.- डॉ. बाबा भांड, अध्यक्ष, राज्य साहित्य व संस्कृती मंडळ
सुफी तत्त्वज्ञानाबाबत चार खंडांत ग्रंथ
By admin | Published: June 18, 2016 1:37 AM