सांगली : सोशल मीडियावरून जुन्या घटनांची चित्रफीत ‘व्हायरल’ केल्याप्रकरणी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कोल्हापूर जिल्ह्यात छापे टाकून व्हॉटस्अॅप ग्रुपच्या चार ‘अॅडमिन’ना प्रतिबंधात्मक कारवाईखाली अटक केली आहे.अफवा पसरविल्याप्रकरणी रविवारी याच ग्रुपमधील चौघांना अटक केली होती. नितीन कुबेर जोग (२८), उमेश धोंडीराम जोग (२७, दोघे रा. माणगाव, ता. हातकणंगले), विजय बाळासाहेब चौगुले (२०) व सौरभ सारंग चौगुले (१९, उचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांचा समावेश आहे. नितीश व उमेश जोग हे व्हॉटस् अॅपवरील ‘दुश्मनोंका आशीर्वाद’ या ग्रुपचे, तर विजय व सौरभ चौगुले हे ‘एबीएस तालिम’ ग्रुपचे अॅडमिन आहेत. त्यांनी ग्रुपवर अफवा पसरविणारी चित्रफीत पडल्यानंतर स्थानिक पोलिसांना माहिती देणे आवश्यक होते. पण त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे ग्रुप अॅडमिनवरही कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी दिले होते.
कोल्हापूरच्या चार व्हॉटस्अॅप ‘ग्रुप अॅडमिन’ना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2017 2:13 AM