रत्नागिरी : देशातील सर्वाधिक अपघात व सर्वाधिक बळी घेणारा ‘डेड ट्रॅक’ ही मुंबई-गोवा महामार्गाची बनलेली प्रतिमाच यापुढे बदलून जाणार आहे. या महामार्गाचे ‘कॉँक्रिटीकरणातून चौपदरीकरण’ काम एप्रिलपासून सुरू केले जाईल. या कामासाठी चार हजार दोनशे कोटी रुपये खर्च येईल व येत्या दोन वर्षात हे काम पूर्ण होईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरीत एका महाविद्यालयाच्या कोनशिला समारंभासाठी गडकरी रत्नागिरीत आले होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगडचे जिल्हाधिकारी तसेच बांधकाम विभाग अधिका:यांच्या बैठकीत मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
महामार्गालगत आतार्पयत 5क् टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. हे काम एप्रिलपूर्वी 8क् टक्केर्पयत पूर्ण करण्यास जिल्हाधिका:यांना सूचना दिल्या आहेत. चौपदरीकरणाच्या भूसंपादन कामाची जबाबदारी पनवेल विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यावर सोपविण्यात आली आहे. भूसंपादन प्रक्रियेसाठी लागणा:या निधीची व्यवस्थाही करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
रस्त्याचे काम प्रथम हाती घेतले जाईल. त्यानंतर मार्गावरील 14 पुलांचे कामही सुरू केले जाईल. या 14 पुलांसाठी साधारणपणो दीडशे कोटी खर्च येणार आहे, असे सांगून ते म्हणाले की, महामार्गावरील अपघात कमी करण्यासाठी सर्व वळणो सरळ करण्यावर भर राहणार आहे. (प्रतिनिधी)
च्महामार्ग चौपदरीकरणात आता कोणत्याही अडचणी नाहीत. कमी खर्चात या मार्गाचे दर्जेदार काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी 32क् रुपयांना मिळणारी सिमेंट बॅग या कामासाठी शासनाला 12क् रुपयांना मिळणार आहे. त्यावरील वाहतूक खर्चही कमी केला जाणार आहे.