मुंबई : दिवा स्थानकात जलद प्लॅटफॉर्मच्या कामानिमित्त मध्य रेल्वेवर २३ आॅक्टोबर रोजी चौथा ९ तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सकाळी ९ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. कल्याणहून सीएसटीला जाणाऱ्या जलद लोकल सकाळी ८.३३ ते १७.४५ पर्यंत कल्याण ते ठाणे दरम्यान धिम्या मार्गावर धावणार असून त्या कल्याण-ठाणे दरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. सीएसटीहून सुटणाऱ्या जलद लोकल सकाळी ८.२९ ते १६.४५ पर्यंत ठाणे-कल्याण दरम्यान डाऊन धिम्या मार्गावर धावतील. त्यामुळे लोकल पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावतील. ब्लॉकमुळेसिंहगड एक्स्प्रेस, राज्यराणी एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस, गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहेत. तर रत्नागिरी-दादर-रत्नागिरी ट्रेन पनवेलपर्यंत धावणार आहे. तर हार्बरवरही ब्लॉक घेण्यात येईल. सीएसटी ते चुनाभट्टी, माहीम दरम्यान सकाळी ११.४0 ते ४.४0 पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सीएसटी ते वाशी, बेलापूर, पनवेल दरम्यान लोकल रद्द केल्या जाणार आहेत. (प्रतिनिधी)
मध्य रेल्वेवर उद्या चौथा विशेष मेगाब्लॉक
By admin | Published: October 22, 2016 1:22 AM