मुंबई : मिनरल वॉटरच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री करून लाखो रुपयांची कमाई केली जात असून सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याची तीव्र भावना दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी व्यक्त केल्यानंतर आता बाटलीबंद पाण्यासाठी येत्या सहा महिन्यांत नियमावली तयार करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी विधानसभेत जाहीर केले. काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. मिनरल वॉटरच्या नावाखाली सुरू असलेल्या लुटीवर सपकाळ यांनी तांत्रिक माहितीसह प्रकाश टाकला. या संदर्भात विधी व न्याय विभागाचे मत मागविण्यात आले आहेत. बंद बाटल्यांमधून पाणीविक्र ी करु न नागरिकांच्या आरोग्याशी सुरु असलेल्या खेळाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. (विशेष प्रतिनिधी)केंद्र सरकारलाही पाठविले पत्र - गिरीश बापटलग्न समारंभ, घरगुती कार्यक्र मांमध्ये जारमधून पाणी दिले जाते. त्यामुळे लोकांची सोय होत असली, तरी हे पाणी शुद्ध असलेच पाहिजे. परंतु यासंदर्भात कायदाच नसल्याने कायदेशीर प्रश्न निर्माण झाला आहे. हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो, त्यामुळे केंद्र सरकारलादेखील पत्र लिहिले आहे, असे बापट यांनी स्पष्ट केले. या वेळी झालेल्या चर्चेत डॉ. सुनील देशमुख, राजेश टोपे, वीरेंद्र जगताप आदींनी भाग घेतला.
मिनरल वॉटरच्या नावाखाली फसवणूक
By admin | Published: July 27, 2016 2:32 AM