शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
4
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
5
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
6
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
7
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
8
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
9
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
10
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
12
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
13
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
14
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
15
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
16
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
17
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
18
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
19
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...

बनावट मुद्रांक गैरव्यवहार खटला १४ वर्षानंतरही प्रलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 10:50 PM

संपूर्ण देशाला हदरवून सोडणा-या कोट्यावधीच्या बनावट मुद्रांक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगी याचे कर्नाटकाच्या तुरुंगात शिक्षा भोगत असताना गुरुवारी निधन झाले़. १४ वर्षापूर्वी सुरु झालेल्या या प्रकरणाचा अद्याप अंतिम निकाल लागला नसून पुण्यातील मोक्का न्यायालयात अजूनही

पुणे - संपूर्ण देशाला हदरवून सोडणा-या कोट्यावधीच्या बनावट मुद्रांक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगी याचे कर्नाटकाच्या तुरुंगात शिक्षा भोगत असताना गुरुवारी निधन झाले़. १४ वर्षापूर्वी सुरु झालेल्या या प्रकरणाचा अद्याप अंतिम निकाल लागला नसून पुण्यातील मोक्का न्यायालयात अजूनही या खटल्याची सुनावणी सुरु आहे़ 

अब्दुल करीम तेलगी याला बनावट मुद्रांक गैरव्यवहार प्रकरणात ३० आॅक्टोंबर २००३ रोजी कर्नाटक पोलिसांनी पुण्याच्या न्यायालयात हजर केले होते़ या घटनेला १४ वर्ष पूर्ण होत आहे़ त्यानंतर अब्दुल करीम तेलगी आणि त्याच्या सहकाºयांवर पुण्याच्या मोक्का न्यायालयात एकूण ६७ आरोपींवर खटला सुरु होता़ तत्कालीन विशेष न्यायाधीश चित्रा भेदी यांच्यासमोर तेलगी व काही मुद्रांक विक्रेत्यांनी आपला गुन्हा कबुल केला़ भेदी यांनी तेलगी याला विविध कलमांखाली १३ वर्षे सक्तमजुरी आणि सुमारे १०० कोटी रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली होती़ त्याच्याबरोबर गुन्हा कबुल केलेल्या मुद्रांक विक्रेत्यांनाही त्यांचा गुन्ह्यातील सहभाग लक्षात घेऊन वेगवेगळी शिक्षा व ५ लाख रुपये दंड ठोठावला होता़ हा गुन्हा कबुल न केलेल्या १२ आरोपीविरुद्ध अजूनही खटला सुरु आहे़ 

माजी आमदार अनिल गोटे, कर्नाटकचे माजी मंत्री चेन्ना बायना कृष्णा यादव, निलंबित पोलीस अधिकारी श्रीधर वगळ, महमंद चाँद मुलाणी, दिलीप कामत, गोकुळ पाटील, लक्ष्मण सूर्यवंशी, दत्तात्रय डाळ, तेलगीचे पुतणे परवेज तेलगी, अब्दुल अझीम तेलगी, त्यांचा वकील अब्दुल रशीद कुलकर्णी आणि तेलगीची पत्नी शहिदा तेलगी यांच्याविरुद्ध मोक्का न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस़ एच ग्वालानी यांच्या न्यायालयात सुनावणी सुरु आहे़ या खटल्यादरम्यान पोलीस उपनिरीक्षक प्रताप काकडे यांचा येरवडा कारागृहात मृत्यु झाला़ त्यांचा खुन करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता़ या खटल्यात तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त रणजितसिंह शर्मा यांना मुंबईचे पोलीस आयुक्तपदावरुन निवृत्त झाल्यानंतर दुसºया दिवशी एसआयटीने अटक केली होती़ पुढे त्यांना या खटल्यातून वगळण्यात आले़ तर, खटल्यातील मुख्य फिर्यादी बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश देशमुख यांना पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे़ 

याबाबत अ‍ॅड़ मिलिंद पवार यांनी सांगितले की, तेलगी व अन्य काही आरोपींनी गुन्हा कबुल केल्याने त्यांना शिक्षा सुनावण्यात आली होती़ ज्यांनी गुन्हा नाकारला त्यांच्याविरुद्ध अजूनही खटला सुरु आहे़ या खटल्यात आतापर्यंत १५० हून अधिक जणांच्या साक्षीपुरावे नोंदविण्यात आले आहेत़ या खटल्याची पुढील सुनावणी ३ नोव्हेंबर २०१७ रोजी आहे़ तेलगी याला १०० कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे़ आपण व अन्य आरोपींचा गुन्हा एकच असतानाही त्यांना अत्यंत अल्प व आपल्याला इतका मोठा दंड सुनावला़ त्याविरुद्ध तेलगी याने सर्वाेच्च न्यायालयात दाद मागितली आहे़ 

खटल्याचा प्रवास

सुमारे ६० हजार कोटी रुपयांच्या या बनावट मुद्रांक गैरव्यवहाराची सुरुवात एका छोट्या प्रकरणातून झाली होती़ बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक संशयास्पद मोटार पोलिसांना आढळून आली़ या मोटारीची तपासणी केली असता, त्यात काही हजार रुपयांचे बनावट मुद्रांक पुण्यात विक्रीसाठी आणण्यात आल्याचे आढळून आले़. ७ जून २००३ रोजी घडलेल्या या घटनेपासून बनावट मुद्रांक प्रकरणाला सुरुवात झाली़ ही मोटार तेलगीची पत्नी शहिदा यांच्या नावावर होती़ यात सापडलेल्या आरोपींकडे केलेल्या चौकशीत मिळालेल्या माहितीवरुन पुणे पोलिसांनी भेंडीबाजार येथे काही दिवस वेषांतर करुन पाळत ठेवली व त्यानंतर बनावट मुद्रांक छापण्याचा छापखाना जप्त केला. याठिकाणी छापलेले सुमारे ७०० कोटी रुपयांचे मुद्रांक व यंत्रसामुग्री जप्त केली होती़ त्याच्याअगोदर कर्नाटक पोलिसांनी बनावट मुद्रांक प्रकरणात अब्दुल तेलगीला अटक केली होती़. तेव्हा तो बंगलोरच्या कारागृहात होता़. या प्रकरणात पत्नी शहिदा हिला आरोपी करण्यात येऊ नये, यासाठी पुणे पोलिसांनी तेलगी करुन कोट्यावधी रुपये उकल्याचा आरोप करण्यात आला़ पुण्याबरोबर १२ राज्यात तेलगीविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते़. पुणे पोलिसांकडून मुंबई पोलिसांकडे तेलगीला हस्तांतरीत केल्यानंतर त्याला हॉटेलमध्ये नेऊन शाही बडदस्त ठेवल्याचा आरोप झाला़ त्यावर जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली़ उच्च न्यायालयाने या सर्व गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची (एस आयटी) स्थापना केली़ तत्कालीन पोलीस अधिकारी सी़ एच़ वाकडे या तपास पथकाचे प्रमुख होते़ या पथकाने पोलीस अधिका-यांसह राजकीय नेत्यांना अटक केली. अनेक वर्षे ते न्यायालयीन कोठडीत होते़ पुढे त्यांना जामीन मिळाला. 

कर्नाटक पोलिसांनी तेलगी याची नार्को टेस्ट केली होती़. त्यात त्याने महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्यांची नावे घेतली होती़. परंतु, त्यावर कधीच कारवाई झाली नाही़.  एस आयटीनंतर या खटल्याची १२ राज्यातील व्यापी लक्षात घेऊन तो सीबीआय कडे खटला वर्ग करण्यात आला़ पुणे न्यायालयात पुणे पोलीस, एसआयटी आणि सीबीआय अशा तीन तपास यंत्रणांनी वेगवेगळे दोषारोपपत्र दाखल केली आहेत़ त्यात हजारो पानांचा समावेश आहे़ 

तेलगी याचा अनेक महागड्या गाड्या, हिरेजडीत घड्याळ व मुद्रांक छापण्यासाठीची मशीनरी असे साहित्य आजही पुण्यात पडून आहे़  

तेलगी याने २० जानेवारी १९९४ रोजी मुद्रांक विक्रीचा परवाना मिळावा, यासाठी राज्य शासनाकडे अर्ज केला होता़ १८ मार्च १९९४ रोजी मुंबईत मुद्रांक विक्रीचा परवाना मिळाला़ त्याने अनेक मुद्रांक विक्रेत्यांकडे संपर्क करुन त्यांचा परवाना दिला तर दरमहा ठराविक रक्कम देण्याचे आमिष त्यांना दाखविले़ मुद्रांक विक्रीतून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने अनेक मुद्रांक विक्रेत्यांनी त्याला आपला परवाना दिला़ या परवान्याचा गैरवापर करुन तेलगीने बनावट मुद्रांक बँका, विमा कंपन्या, वाहन वितरक अशा ज्यांना मोठ्या प्रमाणावर मुद्रांक लागतात त्यांना त्यांच्या कार्यालयात मुद्रांक पोहचविण्यास सुरुवात केली़ ती सर्व अर्थातच बनावट होती़ अशा सुमारे ५ हजाराहून अधिक लोकांना तो मुद्रांक विकत असे़ हे मुद्रांक कधीही न्यायालयात येत नसल्याने ते बनावट आहेत, हे त्यापूर्वी कधीही पुढे आले नव्हते़ 

टॅग्स :thaneठाणे