ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - दिव्यांगांसाठी मुंबईमध्ये 6 ठिकाणी मोफत मोबिलिटी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरामध्ये कृत्रीम पाय, व्हील चेअर, कॅलिपर्स आणि श्रवणयंत्राचं मोफत वाटप करण्यात येणार आहे. रत्ना निधी चॅरिटिबल ट्रस्ट या संस्थेतर्फे या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे.
'आमच्या शिबिरातून देण्यात येणा-या कृत्रीम पाय, व्हील चेअर, कॅलिपर्स आणि श्रवणयंत्रामुळे एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं' असं संस्थेचे ट्रस्टी राजीव मेहता म्हणाले. मुंबईतील जोगेश्वरी, अॅंटॉप हिल,कुलाबा, कुर्ला, वाशी आणि गोवंडी या सहा ठिकाणी 18 जानेवारी ते 8 एप्रिलदरम्यान शिबिर होत आहे. यापैकी जोगेश्वरीयेथील शिबिर नुकतंच पार पडलं. कोणत्याही पूर्व नोंदणीशिवाय ही शिबिरं सर्वांसाठी खुली आहेत. ratnanidhi.in या वेबसाइटवर शिबिराविषयी सर्व माहिती उपलब्ध आहे.