नाशिक : वेगवेगळ्या गुन्ह्यांबद्दल शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची गुन्हेगारी मानसिकता बदलून त्यांना पुन्हा समाजात एक चांगला नागरिक म्हणून जगता यावे, यासाठी राज्यातील सर्व कारागृहांत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे मोफत उच्च शिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी दिली.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि योग विज्ञान प्रबोधिनी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात कैद्यांसाठी आयोजितयोग शिक्षक प्रशिक्षणवर्गाचा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी झाला. त्या वेळी कुलगुरूंनी ही माहिती दिली. विविध पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी अशाप्रकारचे शिक्षणक्रम बंदिवानांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येतील, असे वायुनंदन म्हणाले.या वेळी व्यासपीठावर आमदार बाळासाहेब सानप, डॉ. प्रेमचंद जैन, विद्यापीठाच्या आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे संचालक डॉ. जयदीप निकम, डॉ. किरण जैन, कारागृहाचे उपअधीक्षक प्रमोद वाघ, वरिष्ठ तुरुंग अधिकारी पल्लवी कदम, श्रीमती गुजराती उपस्थित होते. (प्रतिनिधी)नायजेरियन कैद्याचे मनोगतया वेळी प्रशिक्षण घेतलेल्या नायजेरियन कैद्याने मनोगत व्यक्त केले. योग प्रशिक्षणामुळे आपल्यात सकारात्मक बदल झाला आहे. येथून बाहेर पडल्यावर योग साधक म्हणून काम करण्याची तयारी असल्याचे त्याने सांगितले.
‘राज्यातील कैद्यांना मोफत उच्च शिक्षण’
By admin | Published: May 05, 2017 3:45 AM