शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

राज्यभरातील कर्करुग्ण महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन

By admin | Published: July 06, 2017 7:18 PM

राज्यभरातील तब्बल ३० हजार कर्करुग्ण महिलांना या महिन्यापासून वर्षभर मोफत सॅनिटरी नॅपकिन मिळणार आहेत.

- गजानन दिवाण/ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 06 - राज्यभरातील तब्बल ३० हजार कर्करुग्ण महिलांना या महिन्यापासून वर्षभर मोफत सॅनिटरी नॅपकिन मिळणार आहेत. उपचारासाठी होणाऱ्या खर्चाला वैतागलेल्या या महिलांसाठी हा मोठा दिलासा असणार आहे. मुंबईत सात दिवसांच्या उपोषणाच्या काळात मिळालेल्या मदतीतून लातूर जिल्ह्यातील एका महिलेने सामाजिक जाणिवेतून ही जबाबदारी उचलली आहे. बचत गटांनी तयार केलेल्या सॅनिटरी नॅपकिनला जीएसटीतून वगळा यासह इतर मागण्यांसाठी पारधेवाडी (जि. लातूर) येथील विचारधारा ग्रामीण विकास संस्थेच्या सचिव छाया काकडे यांनी २१ ते २७ जूनदरम्यान मुंबईत आझाद मैदानावर उपोषण केले. या आंदोलनात जवळपास २५ हजार महिलांनी सहभाग नोंदविला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्याकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर २७ जून रोजी त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. या आंदोलनाच्या काळात सर्वसामान्यांपासून दिग्गजांपर्यंत अनेकांनी सॅनिटरी नॅपकिन चळवळीला आर्थिक मदत केली. कोणी आंदोलनस्थळी येऊन मोहीम बळकट केली, तर अनेक राजकीय आणि उद्योग क्षेत्रातील आघाडीच्या महिलांनी मीडियापासून दूर राहण्यासाठी घरी बोलावून मदत दिली. आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी ती तब्बल ७५ लाख रुपयांपर्यंत पोहोचली, अशी माहिती छाया काकडे यांनी ‘लोकमत’ला दिली. या पैशांमधून राज्यभरातील कर्करुग्ण महिलांना वर्षभर मोफत सॅनिटरी नॅपकिन देण्यात येणार असल्याचे काकडे यांनी सांगितले. यातील अनेक महिलांना उपचाराचा खर्च परवडणारा नसतो. अशा वेळी त्या सॅनिटरी नॅपकिनचा खर्च कशा भागवतील? मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी नॅपकिनचा वापर न केला तर आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल, म्हणून मी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यभरात अशा महिलांची संख्या ३० हजारांच्या घरात आहे. कमीत कमी पैशांत आणि गरीब गरजूंना मोफत सॅनिटरी नॅपकिन मिळावे, यासाठी औसा (जि. लातूर) तालुक्यातील पारधेवाडी येथे विचारधारा महिला बचत गटाच्या वतीने जानेवारी २०१६ मध्ये रिफ्रेश नावाने सॅनिटरी नॅपकिनचा प्रकल्प सुरू झाला. ‘आरोग्य तिथे संपदा’ या टॅगलाईनने सुरू झालेल्या या प्रकल्पातून आंतरराष्ट्रीय स्टॅण्डर्डचे उत्पादन होत असल्याने अमेरिका आणि दुबईत महिन्याला ६० हजार पॉकेटची निर्यात केली जाते. खरेदी करण्याची कुवत नसलेल्या लातूर जिल्ह्यातील १८०० महिला-मुलींना दर महिन्याला मोफत सॅनिटरी नॅपकिनचे वाटप केले जात असल्याचे काकडे यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यात बचत गटाचा सॅनिटरी नॅपकिन प्रकल्पपारधेवाडी येथे विचारधारा महिला बचत गटाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील ५०० गावांमध्ये सॅनिटरी नॅपकिन चळवळ पोहोचली आहे. अशी चळवळ प्रत्येक जिल्ह्यात निर्माण व्हावी यासाठी राज्यातील ३४ जिल्ह्यांत महिला बचत गटांच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकिन प्रकल्प सुरू केले जाणार आहेत. यासाठी त्यांना राज्य शासन मदत करणार आहे. आॅगस्टअखेरपर्यंत हे सर्व प्रकल्प सुरू होतील. या माध्यमातून जवळपास पावणेदोन लाख महिलांना रोजगार मिळणार असल्याचे काकडे यांनी सांगितले.

बचत गटांच्या सॅनिटरी नॅपकिनला जीएसटीतून वगळलेछाया काकडे यांच्यासह हजारो महिलांनी मुंबईत केलेल्या उपोषणामुळे बचत गटांनी तयार केलेल्या सॅनिटरी नॅपकिनला जीएसटीतून वगळण्याचा निर्णय झाला. १ जुलैपासून त्याची अंमलबजावणीही झाली. या निर्णयाचा फायदा देशभरातील बचत गटांना होणार आहे. याशिवाय कर्करुग्ण महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन व इतर आरोग्य सुविधा, माध्यमिक शाळांत सॅनिटरी वेंडिंग व डिस्पोजल मशीन बसविणे बंधनकारक, पर्यावरणपूरक सॅनिटरी नॅपकिन महिला बचत गटांना चालविण्यास देणे आणि रेशनिंगवर सॅनिटरी नॅपकिन देण्याचा निर्णय १५ आॅगस्टपर्यंत घेतला जाणार आहे.