अकोला: शासकीय आरोग्य यंत्रणा, शहरातील खासगी रुग्णालये, डॉक्टरांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या महाआरोग्य रोगनिदान व उपचार शिबिरातील दोन दिवसांमध्ये अकोला जिल्हय़ातीलच नव्हे तर पश्चिम विदर्भातील रुग्णांनी सहभागी होऊन विविध व्याधींची तपासणी करून उपचार घेतले. दोन दिवसांमध्ये तब्बल १६ हजार २३७ रुग्णांची शिबिरामध्ये तपासणी करण्यात आली. त्यापैकी १४१५ दुर्धर आजारी रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. अकोला क्रिकेट क्लब मैदानावर शनिवारी व रविवारी महाआरोग्य अभियान समितीच्या वतीने पार पडलेल्या महाआरोग्य शिबिरामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सर्वोपचार रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, हिवताप अधिकारी कार्यालय, आरोग्यसेवा उपसंचालक कार्यालय, आयएमए, इंडियन डेन्टल असोसिएशन, अकोला असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट, सर्मपण ग्रुप, संत निरंकारी सेवादल, निमा, हिम्पा, जीपीए, रेडक्रॉस सोसायटी, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, मेघे मेडिकल कॉलेज, सावंगी मेघे, कांबे दंतरोग महाविद्यालय, नागपूरचे वोक्हार्ट हॉस्पिटल आयकॉन हॉस्पिटल, ओझोन हॉस्पिटल, सहारा हॉस्पिटल, ऑर्बिट हॉस्पिटलसह नामांकित तज्ज्ञ डॉक्टर सहभागी झाले होते. शिबिरामध्ये पहिल्याच दिवशी रुग्णांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शनिवारी शिबिरामध्ये ६ हजार ८0८ रुग्णांनी नोंदणी केली होती. रविवारी १0 हजार ४00 रुग्णांनी नोंदणी केली. तब्बल दोन दिवसांमध्ये १६ हजारांवर रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ८ हजार ५२७ पुरुष व ७ हजार ६२३ महिला रुग्णांचा समावेश आहे. शिबिरामध्ये हृदयरोग, शस्त्रक्रिया, स्त्रीरोग, बालरोग, त्वचारोग, कर्करोग, मधुमेह, क्षयरोग, कान, नाक, घसा, अस्थिरोग, दंतरोग आदी आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून नि:शुल्क तपासणी करण्यात आली. २८१0 रुग्णांची ब्लड शुगर तपासणी महाआरोग्य शिबिरामध्ये विविध आजारांसोबतच रुग्णांचा ब्लड शुगर तपासणीकडे अधिकच कल दिसून आला. दोन दिवसांमध्ये २८१0 रुग्णांनी ब्लड शुगर तपासून घेतली. २५८ रुग्णांनी हिमोग्लोबीन, ३0६ रुग्णांची सिकलसेल चाचणी, ८५६ रुग्णांनी लठ्ठपणा (बीएमआय), २२ एक्सरे, ११५ जणांनी गर्भाशयाचा मुख कर्करोग आणि ९00 जणांनी ईसीजी तपासणी करून घेतली. शस्त्रक्रियेसाठी निवड झालेले रुग्ण सर्जरी४६१ नेत्ररोग (कॅट्रॅक्ट)४६३ स्त्रीरोग0६0 अस्थिरोग0३२ दंतरोग२९८ इएनटी१0१ एकूण१४१५
दुर्धर आजाराने ग्रस्त १४१५ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया!
By admin | Published: March 07, 2016 2:42 AM