शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

इजिप्तमधील इमानवर होणार मोफत शस्त्रक्रिया

By admin | Published: January 15, 2017 2:25 AM

इजिप्तमधल्या अलेक्झॅन्ड्रियामधील इमान अहमद अब्लदुलाती या ५०० किलो वजन असलेल्या ३६ वर्षीय महिलेवर प्रख्यात बेरिएट्रीक सर्जन डॉ. मुफ्फझल लकडावाला मोफत

मुंबई : इजिप्तमधल्या अलेक्झॅन्ड्रियामधील इमान अहमद अब्लदुलाती या ५०० किलो वजन असलेल्या ३६ वर्षीय महिलेवर प्रख्यात बेरिएट्रीक सर्जन डॉ. मुफ्फझल लकडावाला मोफत शस्त्रक्रिया करणार आहेत. शस्त्रक्रियेनंतर जवळपास सहा महिने इमानला भारतात डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहावे लागणार आहे. डॉ. मुफ्फझल लकडावाला यांच्या प्रयत्नानंतर चर्नी रोड येथील सैफी रुग्णालयाच्या आवारात ८०० चौरस फूट जागेत विशेष ‘वन बेड हॉस्पिटल’ उभारण्यात येत आहे. या ‘वन बेड हॉस्पिटल’साठी तब्बल दोन कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या विशेष रुग्णालयाचा दरवाजा सात फुटांचा असणार आहे, शिवाय बेडसुद्धा इमानच्या वजनाच्या अनुसार उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच, या हॉस्पिटलमध्ये एक आॅपरेशन थिएटर, एक अतिदक्षता विभाग, डॉक्टरांसाठी एक रूम, दोन विश्रामगृहे, देखभाल करणाऱ्या डॉक्टरांचा कक्ष आणि एक व्हिडीओ कॉन्फरन्स्ािंग रूम अशी रचना असणार आहे. डॉ. लकडावाला यांच्या नेतृत्वाखाली इमानवरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी जगभरातील वैद्यकीय शाखांतील तज्ज्ञांचा समावेश असणार आहे. त्यात हृदयविकारतज्ज्ञ, श्वसनविकारतज्ज्ञ, आहार-पोषणतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, इंटेन्सिव्हिस्टस आणि एन्डोक्रिनोलॉजिस्ट यांचा समावेश असेल. इजिप्तहून इमानला भारतात येण्याचा आणि शस्त्रक्रियेनंतरच्या उपचारांसाठीच्या निधीसाठी डॉ. लकडावाला यांनी ‘सेव्ह इमान कॉझ’ ही आॅनलाइन चळवळ सुरू केली आहे. इमानच्या केसस्टडीच्या अभ्यासानंतर तिच्यावरील शस्त्रक्रियेची प्राथमिक तयारी सुरू झाली आहे. इमानला भारतात आणण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. लकडावाला यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.पंचविशीपासून घरातच...- इमानचे वजन ५०० किलो असल्याने ती जगातील सर्वाधिक वजन असलेली महिला आहे. केवळ ३६ वर्षांची असलेल्या इमानला प्रचंड वजनामुळे घराबाहेर पडता आलेले नाही. वयाच्या पंचविशीपासून ती घरातच आहे. तिला साधे अंथरुणावरून हलताही येत नाही. अवाढव्य आकारामुळे दैनंदिन हालचाली करणेही तिला कठीण होते. इमान दैनंदिन व्यवहारासाठी पूर्णपणे आईसह बहिणीवर अवलंबून राहते. जन्मावेळी तिचे वजन ५ किलो होते.