शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
3
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
4
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
5
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
7
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
8
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
9
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
10
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
11
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
12
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
13
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
14
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
15
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
16
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
17
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
18
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
19
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
20
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

सव्वालाख विद्यार्थ्यांना मोफत गणवेश

By admin | Published: June 06, 2016 11:55 PM

बीड : शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी आनंददायी राहणार आहे. पुस्तकांसोबतच विद्यार्थ्यांना दोन गणवेश मोफत दिले जाणार आहेत. जिल्ह्यातील सव्वालाखाहून अधिक विद्यार्थ्यांना हा लाभ होत आहे.

बीड : शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी आनंददायी राहणार आहे. पुस्तकांसोबतच विद्यार्थ्यांना दोन गणवेश मोफत दिले जाणार आहेत. जिल्ह्यातील सव्वालाखाहून अधिक विद्यार्थ्यांना हा लाभ होत आहे.सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. गट शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत मुख्याध्यापकांना पुस्तकांचे वाटप सुरू आहे. पाठोपाठ गणवेशाचा निधी देखील आला आहे. गणवेश खरेदीचे अधिकार शालेय शिक्षण समिती व मुख्याध्यापकांना दिले असून, विद्यार्थी संख्येनुसार या दोघांच्या संयुक्त खात्यावर निधी जमा केला जाणार आहे. शनिवारी जिल्हा परिषदेला गणवेशापोटी ५ कोटी २६ लाख २६ हजार ८०० रुपये एवढा निधी प्राप्त झाला आहे. हा निधी लवकरच मुख्याध्यापक व शिक्षण समितीच्या खात्यावर वर्ग केला जाईल.शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेशाचे वाटप करून विद्यार्थ्यांना शाळेबद्दल आवड निर्माण करावी, असे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यानुसार सर्व मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. गणवेश वाटपाचा अहवालही मागविण्यात येईल. एकही पात्र विद्यार्थी यापासून वंचित राहू नये याची काळजी घ्यावी, असे आवाहन सर्व शिक्षा अभियानचे उपशिक्षणाधिकारी हिरालाल कराड यांनी केले आहे.तालुकानिहाय गणवेशपात्र विद्यार्थी अंबाजोगाई : ११ हजार ५३०, आष्टी : १४ हजार ६७३, बीड : २० हजार ४७७, धारूर : ७ हजार ७७०, गेवराी : २२ हजार ८२६, केज : ११ हजार ५६६, माजलगाव : १३ हजार ५, परळी : ११ हजार १०३, पाटोदा : ६ हजार ७१८, शिरूर : ६ हजार ६२८, वडवणी : ५ हजार २६०. (प्रतिनिधी)