सदानंद नाईक
उल्हासनगर : शिक्षक दिनाचे औचित्य साधून आमदार कुमार आयलानी यांनी शनिवारी गोलमैदान येथील आमदार कार्यालयात शिक्षकांसाठी मोफत लसीकरणाचे आयोजन केले. ३०० पेक्षा जास्त शिक्षकांनी लसीकरणांचा लाभ घेतल्याची माहिती आयलानी यांनी आहे.
उल्हासनगर महापालिकेने अनुदानित व विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांसाठी गेल्या आठवड्यात लसीकरण शिबिराचे आयोजन केले. शिक्षकांनी लसीकरण योजनेचा फायदा घेतला. यानंतरही अनेक शिक्षक लसीकरण पासून वांचिंत असल्याने, आमदार कुमार आयलानी शिक्षक दिनाचे औचित्य साधून लसीकरण शिबिराचे आयोजन शनिवारी आमदार कार्यालय ठेवण्यात आले. लसीकरणाला शिक्षकांनी हजेरी लावली असून ३०० पेक्षा जास्त शिक्षकाची नोंद यावेळी झाली. लसीकरण झालेल्या शिक्षकांनी आमदार आयलानी यांचे आभार मानले. शिक्षका व्यतिरिक्त अपंग, तृतीयपंथी, गरीब व गरजू नागरिक आदीनाही महिन्यातील प्रत्येक शनिवारी मोफत लसीकरण करण्यात येत असल्याची माहिती आमदार कुमार आयलानी यांनीं दिली. सर्वसामान्य नागरिकांनी महिन्याच्या प्रत्येक शनिवारी कार्यालयातील लसीकरण केंद्राचे लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.