शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
2
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
3
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
4
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
5
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
7
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
8
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
9
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
10
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
11
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
12
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
13
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
14
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
15
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
16
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
17
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
18
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
19
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
20
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."

पोलीस नाईक, हवालदारांचा विभागीय पदोन्नती परीक्षेला बसण्याचा मार्ग मोकळा

By admin | Published: December 22, 2016 4:33 AM

महाराष्ट्र पोलीस नियमांतील नियम ३(अ) मध्ये सुधारणा करत राज्य सरकारने पोलीस विभागांतर्गत पदोन्नती परीक्षेद्वारे

मुंबई : महाराष्ट्र पोलीस नियमांतील नियम ३(अ) मध्ये सुधारणा करत राज्य सरकारने पोलीस विभागांतर्गत पदोन्नती परीक्षेद्वारे पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती मिळवण्यासाठी सहायक उपनिरीक्षक, पोलीस हवालदारासह पोलीस नाईक व हवालदारांनाही परीक्षेला बसण्याची तरतूद केली. मात्र, ही तरतूद घटनाबाह्य आणि अवैध असल्याचे म्हणत, महाराष्ट्र प्रशासकीय लवादाने (मॅट) राज्य सरकारचा निर्णय अयोग्य ठरवला, परंतु बुधवारी उच्च न्यायालयाने मॅटचा २०१४ चा आदेश रद्दबातल करत, राज्य सरकारने कायद्यात केलेली सुधारणा वैध ठरवली. त्यामुळे पोलीस नाईक व हवालदारांचा पदोन्नती परीक्षेला बसण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.न्या. अनूप मोहता व न्या अजय गडकरी यांच्या खंडपीठाने राज्य सरकारचा निर्णय अयोग्य व घटनाबाह्य नसल्याचे स्पष्ट करत, मॅटचा ९ जुलै २०१४ चा आदेश रद्द केला.राज्य सरकारने मॅटच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पोलीस विभागाला आवश्यकतेनुसार नियम बदलण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे मॅटने दिलेला आदेश अयोग्य असून, तो रद्द करण्यात यावा, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी खंडपीठापुढे केला. पोलीस नियमांतील नियम ३ (अ) मध्ये सुधारणा करण्यापूर्वी पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती मिळवण्यासाठी या परीक्षेला केवळ पोलीस हवालदार आणि सहायक पोलीस निरीक्षक यांनाच बसण्याची परवानगी होती. परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांचे स्वास्थ्य व सतत पाच वर्षे सेवा किंवा सात वर्षांची खंडित सेवा, या बाबीही लक्षात घेण्यात येत होत्या. २०१३ मध्ये सरकारने पोलीस नियमांत बदल करत, हवालदार व पोलीस नाईक यांनाही या परीक्षेला बसण्याची मुभा दिली. मात्र, परीक्षेला बसणाऱ्या उमेदवाराच्या सेवेत किमान दहा वर्षे सातत्य असण्याची अट घातली.या सुधारणेला काही पोलिसांनी मॅटमध्ये आव्हान दिले. पोलीस नाईक व हवालदारांनाही परीक्षेला बसू दिल्याने, त्यांची पदोन्नतीची संधी कमी होईल. गेली कित्येक वर्षे पोलीस दलात काम करत असल्याने, सेवाही लक्षात घेण्यात यावी, असा याचिकाकर्त्या पोलिसांतर्फे अ‍ॅड. गजानन सवागवे यांनी खंडपीठापुढे युक्तिवाद केला.उच्च न्यायालयाचे मॅट व अन्य कागदपत्रे वाचत, राज्य सरकारचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले. ‘सुधारित नियम कायद्याच्या चौकटीतच आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी करण्यात यावी. पोलीस विभागाला आवश्यकतेनुसार, नियमांत बदल करण्याचा अधिकार आहे. हा धोरणाचा एक भाग आहे,’ असे म्हणत, खंडपीठाने राज्य सरकारचा पोलीस पदोन्नतीचा मार्ग मोकळा केला.सुधारित नियमानुसार, सरकार पात्र ठरलेल्या २५८ पोलिसांची पुन्हा एकदा यादी जाहीर करेल, तर या पूर्वीच पात्र ठरलेले १०९७ पोलिसांची पदोन्नती नियमित केली जाईल. (प्रतिनिधी)