बंडगार्डन : गांजा न दिल्याच्या कारणावरून मित्रचा गळा आवळून खून करून पसार झालेल्या तिघांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. 48 तासांत बंडगार्डन पोलिसांनी खुनाचा गुन्हा सोमवारी उघडकीस आणला.
जावेद सलीम शेख (वय 26, रा. कमाल बाबा दर्गा, पुणो स्टेशन पार्किगमध्ये), प्रशांत ऊर्फ मोठय़ा चिकण्या रमाकांत जाधव (वय 23, रा. एसटी स्टॅण्ड पार्किग, पुणो स्टेशन) व ऋषिकेश ऊर्फ रम्या हनुमंत गडकर (वय 19, रा. आळंदी देवाची) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
राजन ऊर्फ आमल्या भिवाराजी कासार (वय 19, रा. स्वारगेट कॅनॉलजवळ झोपडपट्टी) असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) एस. बी. निकम यांनी सांगितले, की दि. 3क् जुलै रोजी पुणो स्टेशन एसटी स्टॅण्ड शेजारी रेल्वेच्या मोकळ्या जागेतील दत्त मंदिराच्याजवळ एका अनोळखी तरुणाचा धारदार हत्याराने वार करुन खून केल्याची घटना घडली होती. यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या तपासात हा मृतदेह राजन कासार याचा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तपासात कासार याच्यावर चोरीचा प्रय} केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांना समजले. मृत व्यक्ती निष्पन्न झाल्यानंतर त्या अनुषंगाने पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सखोल चौकशी केली. त्यामध्ये त्यांना घटनेच्या दिवशी तिघे आरोपी आणि राजन कासार यांच्यात 3क् जुलैच्या रात्री गांजा पित बसले असताना जोरदार भांडणो झाली असल्याचे समजले. कासार याच्याकडे गांजाच्या पुडय़ा होत्या; परंतु तो आरोपींना देण्यास तयार नसल्याने तिघांनी त्याचा खून केला. त्याला रक्ताच्या थारोळ्यात टाकून तिघे पसार झाले. त्यांना आता अटक केली आहे.
4आरोपींची नावे निष्पन्न झाल्यानंतर आरोपी हे पिंपरी येथे लपून बसल्याचे समजल्यानंतर त्यांना पिंपरी येथून सापळा रचून अटक करण्यात आली. आरोपींनीही गांजा न दिल्याच्या कारणावरून खून केल्याचे कबूल केल्याचे निकम म्हणाले. त्यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर गुन्ह्यात वापरलेले हत्यार व गुन्ह्याच्या दिवशीचे घातलेले कपडे जप्त करायचे असल्याने तसेच आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत का, याचा तपास करायचा असल्याने सरकारी वकील अनंत चौधरी यांनी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने तिघांना दि. 8 ऑगस्टर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.