धामणगाव : पन्नास हजारांसाठी मित्रच्याच आठ महिन्यांच्या चिमुकलीचे अपहरण केल्यानंतर दोन दिवसांपासून आणखी रकमेची मागणी करणा:या अपहरणकत्र्या जोडप्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी रविवारी रेल्वे प्रवासादरम्यान पकडले आणि रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केल़े
अतुल आनंद काटे व त्याची पत्नी विशाखा, अशी या भामटय़ांची नावे आहेत. नागपूरमधील मानेवाडा भागात राहणारे मनोज वैरागडे यांची आठ महिन्यांची चिमुकली परी घरी खेळत होती. गुरुवारी दुपारी 3 वाजता याच भागात भाडय़ाने खोली करून राहणारा मनोजचा मित्र अतुल व विशाखा यांनी परीला खेळायला नेतो, असे सांगत सोबत नेले. दोन तासांनंतरही ते परत न आल्याने मित्रनेच मुलीचे अपहरण केल्याची मनोज यांना शंका आली. शुक्रवारी त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. शुक्रवारी दुपारी अतुल व विशाखाने तुमच्या मुलीचे अपहरण केले असून, तिच्या सुटकेसाठी पन्नास हजार रुपये माङया बँक खात्यात जमा करा, अशी फोनवर धमकी दिली. मनोज यांनी त्वरित तीस हजार रुपये अपहरणकत्र्या जोडप्याच्या बँक खात्यात जमा केल़े
धामणगाव शहरात विदर्भस्तरीय तीन दिवसीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रांतीय बैठक सुरू आह़े नगर कार्यवाह गोपाल विजयप्रकाश भैया यांना नागपूर येथील त्यांचे मेहुणो नरेंद्र गांधी यांचा फोन आला. अपहरणकर्ते जोडपे रविवारी अकोला येथून नागपूरला गोंडवाना एक्स्प्रेसने जात असल्याचे त्यांनी सांगितल़े क्षणाचाही वेळ न घालविता गोपाल भैया यांनी स्वयंसेवकांसह स्टेशन गाठले. बोगी क्रमांक एस-7 मध्ये अपहरणकर्ते जोडपे मुलीला घेऊन बसले होते. स्वयंसेवकांनी मुलीला ताब्यात घेतले.
तीन दिवस आक्रोश
गुरुवारी अपहरण केलेल्या परीचा तीन दिवस आक्रोश सुरू होता़ परी रडत असल्याने त्यांनी तिला दुधात गुंगीचे औषध दिले. (प्रतिनिधी)