मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा! साहेब ठरवतील तेच धोरण, श्रीनिवास पाटलांची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 11:41 AM2023-07-03T11:41:16+5:302023-07-03T11:58:49+5:30
श्रीनिवास पाटलांचा अजित पवारांना आशिर्वाद आहे की शरद पवारांसोबत आहेत असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. तेव्हा श्रीनिवास पाटलांनी मी साहेबांचा होतो. आहे, राहीन अशा शब्दांत उत्तर दिले.
अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्यानंतर राष्ट्रवादीचे दोन खासदार त्यांच्या शपथविधीला उपस्थित राहिले होते. परंतू, शरद पवारांचे अत्यंत विश्वासू आणि मित्र श्रीनिवास पाटील तिथे नव्हते. प्रफुल्ल पटेल तिथे दिसले होते. आता श्रीनिवास पाटलांची या संघर्षावर पहिली प्रतिक्रिया आली आहे.
श्रीनिवास पाटलांचा अजित पवारांना आशिर्वाद आहे की शरद पवारांसोबत आहेत असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. तेव्हा श्रीनिवास पाटलांनी मी साहेबांचा होतो. आहे, राहीन अशा शब्दांत उत्तर दिले.
मी साहेबांचा होतो. आहे, राहीन. प्रितीसंगमावर आमचे गुरु विसावले आहेत. त्यांच्या दर्शनाला माझे मित्र येतायत. ते ठरवतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण. त्यांच्याबरोबर आमचे समाजकारण, निवडणुकीपुरते राजकारण या पलिकडे ज्याने आयुष्यभर स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांची साथ दिली. गोरगरीबांची साथ दिली, पुरोगामी धोरण स्वीकारले त्या माझ्या मित्रासोबत मी कायम राहणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
शरद पवारांसोबतच जाणार. मुळचे धोरण चव्हाणांचे, समान्यांचा नेता म्हणून ते देशभर गाजले. त्यांच्या पंथातील एक पाईक, सहकारी आणि साथी म्हणून मी पवारांसोबत राहणार. अजित पवारांविषयी मला माहिती नव्हते. मी माझ्या मतदारसंघात होतो, असे पाटील म्हणाले.