"आधी आभाळ बघायचं, वारं बघायचं मग..."! निवडणूक कोणत्या पक्षातून लढवणार? अमोल कोल्हे यांचं सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 09:48 PM2023-04-14T21:48:36+5:302023-04-14T21:59:36+5:30
Amol Kolhe : तुम्ही राष्ट्रवादी मधूनच निवडणूक लढवणार ना? असे माध्यम प्रतिनिधींनी छेडले असता तुम्हाला का शंका वाटते? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.
कराड - मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. सध्या शेतकरी कुठे शेतात दिसतोय का? अगोदर आभाळ बघायचं, वारं बघायचं मग नंतर नांगरायचं, असं म्हणत लोकसभा निवडणूक लढवायची का? कोठून लढवायची? कशी लढवायची हे वारं बघून ठरवायचं, असं सूचक विधान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
कराड येथे २८ एप्रिल ते ३ मे दरम्यान शिवपुत्र संभाजी महानाट्य आयोजित केले आहे. त्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. कोल्हे बोलत होते. यावेळी दिपक शिंदे, वासू पाटील, प्रसाद देशपांडे, विनायक कवडे आदींची उपस्थिती होती.
"आधी आभाळ बघायचं, वारं बघायचं मग..."! निवडणूक कोणत्या पक्षातून लढवणार? अमोल कोल्हे यांचं सूचक विधान#Amol_Kolhe#NCP#BJPpic.twitter.com/o5mbIHp24I
— Lokmat (@lokmat) April 14, 2023
तुम्ही राष्ट्रवादी मधूनच निवडणूक लढवणार ना ? असे माध्यम प्रतिनिधींनी छेडले असता तुम्हाला का शंका वाटते? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. त्यावर माध्यम प्रतिनिधींनी मोदींनी तुमचं सभागृहात कौतुक केलं याकडे लक्ष वेधले.त्यावर पंतप्रधान मोदींनी माझं सभागात कौतुक केलं हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. अशा शब्दात डॉ.कोल्हेंनी पंतप्रधान मोदींचे कौतुकच केले. पण मी राष्ट्रवादीतूनच लढणार आहे असे मात्र त्यांनी स्पष्ट सांगितले नाही. त्यामुळे त्यांच्या मनात नेमकं काय चाललयं? अशी शंका निर्माण होतेच.