शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

पुरंदर, दौंडमध्ये नोटाबंदीविरोधात मोर्चा

By admin | Published: January 07, 2017 1:19 AM

नोटाबंदीच्या विरोधात आज (दि. ६) संपूर्ण राज्यभर काँग्रेसच्या वतीने तालुका आणि जिल्हास्तरावर आंदोलने होत आहेत.

सासवड : नोटाबंदीच्या विरोधात आज (दि. ६) संपूर्ण राज्यभर काँग्रेसच्या वतीने तालुका आणि जिल्हास्तरावर आंदोलने होत आहेत. सासवड येथील तहसील कार्यालयावर पुरंदर काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली ‘जन आक्रोश’ मोर्चा काढण्यात आला. या वेळी येथील स्टेस्ट बँक आणि तहसीलदार सचिन गिरी यांना निवेदन देण्यात आले. यानंतर झालेल्या सभेत संजय जगताप यांनी, शासनाच्या या निर्णयाबाबत बोलताना, शासनाने निर्णय घेताना पर्यायी व्यवस्था केली. यातून फक्त सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार अडचणीत आला असून यापुढील तीन महिन्यांतही ही परिस्थिती सुधारेल का, याबाबत शंका उपस्थित केली. पुरंदर उपसा योजनेच्या ढिसाळ नियोजनावरही टीका करून यात सुधारणा करण्यासाठी तीव्र आंदोलने करण्याचा इशारा दिला. शासनाने उद्योजकांचे कर्ज राईट आॅफ केले त्याप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, शेती वीजपंपांचे बिल माफ करावे, जिल्हा बँकांना पूर्ववत चलनपुरवठा करावा, बँक अधिकाऱ्यांनी गरीब आणि श्रीमंतांना पैसे देताना दुजाभाव करू नये, बँकांतील जमा पैशांवर व्याज द्यावे आणि बँकांच्या रांगेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने केंद्र आणि राज्य सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. सासवड येथील काँग्रेसच्या कार्यालयापासून तहसील कचेरीपर्यंत शासनविरोधी घोषणाबाजी करत हा मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, पंचायत समिती सदस्य दत्ता झुरंगे, दिलीप धुमाळ, महिलाध्यक्षा भारती गायकवाड, युवक अध्यक्ष विकास इंदलकर, सासवडचे नूतन नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, जेजुरीच्या नगराध्यक्षा वीणा हेमंत सोनवणे, शहर काँग्रेसचे रोहित इनामके, सागर जगताप, नंदकुमार जगताप, उपनगराध्यक्ष सुहास लांडगे, नगरसेवक अजित जगताप, संदीप जगताप, मनोहर जगताप, संजय जगताप, प्रवीण भोंडे, योगेश गिरमे यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)>सामान्य जनतेची पिळवणूक दौंड : दौंड येथे नोटाबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. दरम्यान या मोर्चात मोदी सरकारच्या विरोधार्थ घोषणा देण्यात येत होत्या. येथील आंबेडकर चौकापासून मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील मुख्य रस्त्यावरून हा मोर्चा तहसील कचेरीत गेला. या वेळी नोटाबंदीच्या निषेधार्थ आणि सर्वसामान्य जनतेची होत असलेली पिळवणूक यासंदर्भात तहसीलदार विवेक साळुंके यांना निवेदन देण्यात आले. या वेळी दौंड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष पोपटराव ताकवणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजार आणि पाचशेच्या नोटा चलनातून अचानक बंद केल्या; परंतु त्याच क्षमतेने बँकेत जनतेसाठी नोटा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. त्यामुळे अनेकांचे हाल होत आहेत. तर काही वयोवृद्ध व्यक्ती बँकेच्या रांगेत उभे राहिल्याने त्यांना मृत्यू आल्याच्या घटना घडलेल्या आहेत. तर या घटनांना जबाबदार कोण? असे ताकवणे म्हणाले. या मोर्चात पोपटराव ताकवणे, बाबा शेख, राबिया हुमनाबाद, मालन दोरगे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.>मोदी म्हणाले ५0 दिवसांनंतर सर्व काही सुरळीत होईल; मात्र ५0 दिवस उलटून गेले तरी चलन सुरळीत झाले नाही. याचा फटका मात्र गोरगरीब जनतेला बसत आहे. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याकामी लक्ष घालून जनतेची पिळवणूक थांबवावी.- बाबा शेख, काँग्रेस शहराध्यक्ष