ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ८ - सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टीट्युटच्या कार्यक्रमात काल रविवारी ब्रम्हऋषी गुरुवानंद स्वामी हे आपल्या हाताच्या पंज्यातून मन्याची माळ प्रकट होत असल्याचे उपस्थितांना दाखवीत होते. तसेच ती माळ आशीर्वाद आणि प्रसाद म्हणून देण्यात येत होती. काही पुरस्कार मिळवणाऱ्यांना ही माळ हातातून प्रकट करून दिल्या गेली. ही माळ मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील आशीर्वाद म्हणून घेतली.
राज्यात अंधश्रद्धा प्रतिबंधक कायदा लागू आहे. त्यामुळे एका सामूहिक कार्यक्रमात गुरुवानंद स्वामी यांनी हाताच्या पंज्यातून मण्याची माळ प्रकट करणे आणि ते ही मुख्यमंत्र्यांच्या पत्नीसमोर हे कितपत योग्य आहे, असे उपस्थितांचे म्हणणे होते.
स्वामींनी मला स्टेजवर बोलावलं आणि ते माझ्या आजोबांच्या वयाचे असल्याने मी त्यांचा आशीर्वाद घेतला झालेल्या प्रकरणावर अमृता फडणवीस यांनी असे स्पष्टीकरण दिले आहे.