शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
2
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
3
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
4
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
5
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
6
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
7
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
8
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
9
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
10
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
11
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
12
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
13
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
14
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
15
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
16
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
17
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
18
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
19
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
20
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा मोर्चा

By admin | Published: January 29, 2015 5:43 AM

अभियांत्रिकी शाखेच्या महाविद्यालयीन अभ्यासक्रमात बदल करताना २०१५-१६ साली चौथ्या वर्षात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यातून सूट

मुंबई : अभियांत्रिकी शाखेच्या महाविद्यालयीन अभ्यासक्रमात बदल करताना २०१५-१६ साली चौथ्या वर्षात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यातून सूट देण्याची मागणी करीत शेकडो विद्यार्थ्यांनी बुधवारी आझाद मैदानावर धडक मोर्चा काढला. पहिली तीन वर्षे केलेल्या अभ्यासानंतर थेट चौथ्या वर्षी नव्या अभ्यासक्रमाचा समावेश केल्याने विद्यार्थ्यांच्या एकूण ग्रेडवर त्याचा परिणाम होण्याची भीती विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.अभियांत्रिकी शाखेत पहिली तीन वर्षे हा चौथ्या वर्षाचा पाया भक्कम करणारी असतात. त्यामुळे केवळ तीन वर्षे यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना जुन्या अभ्यासक्रमानुसार चौथ्या वर्षी शिक्षण घेण्याची मुभा देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. या नव्या अभ्यासक्रमामुळे शेवटच्या वर्षी बहुतेक विद्यार्थी कमी गुणांनी उत्तीर्ण होण्याची शक्यता आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.याआधीही अभियांत्रिकीच्या चौथ्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी शासनाने १९९९, २००४ आणि २००९ साली जुन्या अभ्यासक्रमानुसार शिक्षण घेण्याची सवलत दिली होती. त्याची पुुनरावृत्ती करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. जुन्या अभ्यासक्रमाची मागणी करीत अभियांत्रिकी शाखेतील ६३ महाविद्यालयांतील ३ हजार ५०० विद्यार्थी एकत्र आले आहेत. इतर महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनाही एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)