शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

पंधरा दिवसांत ३२०० कोटींची एफआरपी जमा : साखर आयुक्तालय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2019 4:35 PM

राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी एफआरपीसाठी आंदोलन सुरु केले आहे.

ठळक मुद्देशेतकरी आंदोलन आणि साखर आयुक्तालयाच्या कारवाईनंतर थकबाकी जमा

पुणे : उसाच्या रास्त आणि किफायतशीर दरासाठी (एफअरपी) शेतकरी संघटनांनी केलेल्या आंदोलनानंतर राज्यातील साखर कारखान्यांनी गेल्या पंधरा दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल ३ हजार २९७ कोटी ४८ लाख रुपयांची थकबाकी जमा केली आहे. शेतकऱ्यांना हंगाम सुरु झाल्यानंतर एफआरपीचे ८ हजार ४६४ कोटी ४७ लाख रुपये मिळाले आहेत. कायद्यानुसार शेतकऱ्यांना ऊस गाळपानंतर १४ दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक आहे. मात्र, ३१ डिसेंबर अखेरीसच्या गाळपाआधारे १८५ कारखान्यांपैकी केवळ ११ कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपीची रक्कम दिलेली होती. राज्यात १५ जानेवारी अखेरीस ५ हजार ३२० कोटी ३६ लाख रुपयांची थकबाकी होती. राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी एफआरपीसाठी आंदोलन सुरु केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने २७ जानेवारीला साखर आयुक्तालयावर हल्लाबोल आंदोलनही केले. त्यानंतर साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी ३९ साखर कारखान्यांना रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टीफिकेट (आरआरसी) बजावले. तसेच, इतर कारखान्यांविरोधातही आरआरसी कारवाईची प्रक्रिया सुरु केली.दरम्यान, राज्यातील अनेक कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देण्यास सुरुवात केली. राज्यात १५ जानेवारी अखेरच्या गाळपानुसार ३१ जानेवारी अखेरीस सुरु असलेल्या १९० साखर कारखान्यांकडे १३ हजार ३०५ कोटी ६२ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्या पैकी ८ हजार ४६४ कोटी ४७ लाख रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. केवळ पंधरा दिवसांत कारखान्यांनी ३ हजार २९७ कोटी ४८ लाख रुपयांचा भरणा केला आहे. शनिवारी (दि. २) झालेल्या ५९ कारखान्यांच्या सुनावणी झाली. सुनावणीपुर्वी या कारखान्यांनी १ हजार ५८० कोटी १४ लाख रुपये एफआरपी दिली होती. सुनावणीच्या दिवशी पर्यंत त्यात आणखी २३८ कोटी रुपयांची भर पडली होती. त्यातील ५ कारखान्यांनी शंभरटक्के एफआरपी दिली आहे. -----------------------

                                              १५ जानेवारी अखेरची स्थिती        ३१ जानेवारी अखेरची स्थितीगाळप कारखाने                          १८५ (३१ डिसेंबर अखेरीस)        १९० (३१ जानेवारी अखेरीस)गाळप ऊस (लाख टन)                     ५४२.४२    (३१ डिसें.)        ४२६.८४ (१५ जाने. अखेरीस)देय एफआरपी कोटींमध्ये            १०४७८.३४ (१५ जाने.)        १३३०५.६२ (३१ जाने.)थकीत एफआरपी                         ५३२०.३६                          ४८४१.१५दिलेली एफआरपी                          ५१६६.९९                               ८४६४.४७पूर्ण एफआरपी दिलेले कारखाने      ११                                         ११७१ ते ९१ टक्के एफआरपी दिलेले    ४७                                         ६२२६ ते ५० टक्के दिलेले                         २१                                                        ५३२५ पेक्षा कमी दिलेले                        २६                                         १४शून्य एफआरपी दिलेले                   २५

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेGovernmentसरकारFarmerशेतकरी