शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
4
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
7
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
8
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
9
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
10
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
11
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
12
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
13
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
14
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
15
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
16
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
17
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
18
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
19
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल

‘एफआरपी’बाबत तडजोड नाही

By admin | Published: October 27, 2016 12:53 AM

साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपी देणे कायद्यानेच बंधनकारक आहे. त्यामुळे ती एकरकमी कशी मिळेल, यासाठी सरकार आग्रही असेल त्यामध्ये कोणतीही तडजोड आम्ही

कोल्हापूर : साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपी देणे कायद्यानेच बंधनकारक आहे. त्यामुळे ती एकरकमी कशी मिळेल, यासाठी सरकार आग्रही असेल त्यामध्ये कोणतीही तडजोड आम्ही करू देणार नाही, अशी भूमिका सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केली.जयसिंगपूर येथे मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पंधरावी ऊस परिषद झाली. त्यामध्ये एकरकमी ३२०० रुपये उचल देण्याची मागणी करण्यात आली. सरकारने पुढाकार घेऊन कारखानदार व संघटना प्रतिनिधी यांच्यात ५ नोव्हेंबरपर्यंत चर्चा घडवून आणावी, अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग मोकळा असल्याचे संघटेनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर केले आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकार या प्रश्नात मध्यस्थी करून चर्चा सुरू करणार आहे का, हे जाणून घेण्यासाठी सहकारमंत्र्यांशी संपर्क साधला. परंतु त्यांनी याबाबत स्पष्टपणे उत्तर न देता त्याला बगल देणेच पसंत केले. मंत्री देशमुख म्हणाले की, शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही अशीच सरकारची भूमिका आहे. जास्त रक्कम किती द्यायची यासंबंधीचा निर्णय हा ज्या-त्या कारखान्याच्या व्यवस्थापनाने घ्यायचा आहे. कारण प्रत्येकाची आर्थिक स्थिती वेगळी आहे. त्यामुळे सरसकट एवढी वाढ द्या, असे सरकार म्हणून आम्ही सांगणे संयुक्तिक ठरत नाही. शेतकरी संघटनांनीदेखील साखरेचा भाव, उपलब्ध साखर, कारखान्यांची स्थिती याबाबतची वस्तुस्थिती समजून घ्यावी. (प्रतिनिधी)संघर्ष चिघळू नये...- कोणत्या कारखान्याने किती दर द्यावा हे आम्ही कसे त्यांना सांगणार, अशी भूमिका काँग्रेसच्या काळात घेतली गेली. त्यामुळे ऊस आंदोलनातील संघर्ष चिघळत असे. आता तसे होऊ नये म्हणून सरकारचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित घटकांना एकत्र बोलावून किमान चर्चा घडवून आणायला हवी तरच त्यातून काही मार्ग निघू शकेल, असे या क्षेत्राशी संबंधित जाणकारांचे म्हणणे आहे .