शहरं
Join us  
Trending Stories
1
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
2
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
3
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
4
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
5
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
6
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
8
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
9
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
10
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
11
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
12
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
13
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
14
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
15
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
16
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
17
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
18
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
19
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
20
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका

आंतरपिकातून फुलवली देशी तूर

By admin | Published: April 04, 2017 8:34 AM

आधुनिक शेतीकडे वळताना, पारंपरिक पद्धतीचा खुबीने वापर करत उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न नवापूर तालुक्यातील धनराट येथील रशिद गावीत या शेतकऱ्याने केला आहे़

ऑनलाइन लोकमत/भूषण रामराजे

नंदुरबार, दि.4 - आधुनिक शेतीकडे वळताना, पारंपरिक पद्धतीचा खुबीने वापर करत उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न नवापूर तालुक्यातील धनराट येथील रशिद गावीत या शेतकऱ्याने केला आहे. त्यांच्या या प्रयत्नांतून निर्माण झालेल्या ‘देशी तूर’ या वाणाला गेल्यावर्षात जीआय मानांकन मिळाले आहे.

 

नवापूर शहरापासून साधारण १० किलोमीटर अंतरावर धनराट येथील ४१ वर्षीय रशिद गावीत यांनी २० वर्षांपूर्वी वडिलोपार्जित ७० गुंठे शेती कसण्यास सुरुवात केली होती़ नवापूर येथे पदवीचे शिक्षण घेत असतानाच शेती करण्यास सुरुवात केल्याने सुरुवातीच्या काळात त्यांना अपयशच आले़ आधीच कोरडवाहू शेती, त्यात उत्पन्न शून्य यामुळे नोकरीसाठी गुजरात गाठण्याच्या विचारात असतानाच रशिद गावीत यांना पारंपरिक तूर उत्पादन घेण्याचा सल्ला नवापूर तालुक्यात काम करणाऱ्या एका शेतकी संस्थेचे प्राग़णेश हिंगमिरे यांनी दिला.

 

या सल्ल्यानंतर मात्र मग गावीत यांनी मागे वळून पाहिलेच नाही़ त्यांनी २०१३ पासून तूर च्या देशी वाणासाठी घेतलेल्या कठोर परिश्रमाचे चीज म्हणजे लागवडीच्या १२० दिवसांनंतर उत्पन्न येणाऱ्या देशी वाणाला, गेल्या वर्षी ३१ मार्च २०१६ रोजी पेटंट आणि जीआय मानांकन मिळालं आहे. गावीत यांनी केवळ पारंपरिक लागवड पद्धत ‘जैसे थे’ ठेवत आंतरपीक पद्धतीच्या लागवडीत बदल करून उत्पादनाची वाढ ही वेगाने करण्याचा आजवरचा हा सर्वाधिक आगळावेगळा प्रयोग ठरल्याचा निर्वाळा नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदने दिला आहे.

 

शेतीत सातत्याने वेगळे प्रयोग करण्यापेक्षा लागवड पद्धतीत बदल करणाऱ्या गावीत यांची नवी दिल्लीच्या भारतीय कृषी अनुसंधान परिषदेत शेतकरी सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. परिषदेमार्फत वर्षभरात होणाऱ्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून ते शेतकऱ्यांना सेंद्रीय शेती आणि उत्पादनवाढ याबाबत धडे देतात़ तसेच तूर उत्पादनावरही त्यांच्याकडून मार्गदर्शन होते. देशी तूर उत्पादनासाठी नवापूर तालुक्यातील ५०० शेतकरी सहभागी झाले आहेत़ रशिद गावीत यांनी आंतरपीक पद्धतीत बदल करून देशी तूर वाणाचे यशस्वी उत्पादन घेतले आहे़ जिओग्राफीकल इंडिकेशन अर्थात भौगोनिक निर्देशन म्हणजे जीआय मानांकन होय़ या मानांकनामुळे शेतमालाची नेमकी ओळख निर्माण होते़ त्या शेतमालाच्या गुणवत्तेची खात्री निर्धारित होते़ ग्राहकांना गुणवत्तेची खात्री पटल्यामुळे तो जादा दर देण्यास उत्सुक असतो़ यातून उत्पादन निर्यात वृद्धीतही वाढ होते़ महाराष्ट्रात अद्याप केवळ १८ शेती उत्पादनांना जीआय मानांकन मिळाल आहे. त्यातून नवापूरच्या तुरीचा समावेश आहे.

 

रशिद गावीत यांनी गेल्या २०१३ पासून सुरू केलेल्या या उपक्रमात आता ५०० शेतकरी जोडले गेले आहेत़ पुणे येथील एका खाजगी शेतकी संस्थेसह धनराट येथील बळीराजा कृषक मंडळ याद्वारे या देशी तुरीचे जगभरात ब्रँडीग सुरू आहे़ नवापूर तालुक्यात रंगावली, परिसर, खेकडा आणि विसरवाडी परिसरात हा देशी तूर पिकवला जात आहे़ प्रत्येक शेतकऱ्याला एकरी पाच ते सहा एकर येणाऱ्या तूर उत्पादनामुळे शेतकरी दाळ विकत घेतच नाही. घरगुती उत्पादन भरघोस असल्याने शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे.

 

नवापूर तालुक्यात पूर्वी भात लागवड करणारे शेतकरी तीन ओळी भात लागवड झाल्यावर त्यात एक चर तूर लागवड करत असत़ यामुळे त्यांच्या दाल-चावलची सोयी होत होती़ कालांतराने इतर पिकांचा शिरकाव नवापूर तालुक्यात झाला़ तूर मात्र आंतरपिकच होते़ आता मात्र तालुक्यात मोठा बदल झाला आहे़ तालुक्यात ६१ पूर्णवेळ तूर उत्पादक आहेत़ तर ३५९ शेतकरी हे तूर पिकात विविध प्रयोग करून उत्पादन वाढीचा प्रयत्न करत आहेत़ हे प्रयत्न संपूर्ण पारंपरिक पद्धतीने आहेत, हे विशेष.सरीचे अंतर वाढवून घटवले दिवस४नवापूर तालुक्यात डोंगरउतारावर आणि सपाटीच्या गावातही मिश्रपीक पद्धतीनुसार तूर उत्पादन घेण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे़ या परंपरेनुसार तूर उत्पादन घेतले जात होते़ प्रोटीनयुक्त असलेला हा तूर नगदी पीक म्हणून कालांतराने अस्तित्वात आला़ साधारण १८० व १५० दिवस अशा दोन कालावधीत तूर उत्पादन येत होते़ लांबणीवर पडणाऱ्या या तूरीचे उत्पादन हे लवकर यावे, यासाठी रशिद गावीत यांनी सोयाबीन पिकात तूर आंतरपीक म्हणून २०१३ मध्ये पहिल्यांदा पेरले़ यात त्यांनी सहा ते नऊ फूट अंतर ठेवले़ या अंतरामुळे तुरीचा फुलोरा अधिक गोल आणि मोठा आला़ या तुरीचे उत्पादन तब्बल १२० दिवसातच हाती आले़ ही होती नवापूर तालुक्यातील देशी तूऱ याला स्थानिक भाषेत खोकळी आणि दिवाळीनंतर येणारी दिवाळकी असेही म्हटले जाते़ ४तुरीच्या एका झाडाला साधारण ३५० येणाऱ्या शेंगा पिकाला अधिक दमदार बनवत आहेत़ एका शेंगमध्ये तीन दाणे येत असल्याने उत्पादनात वाढ होते़ पांढऱ्या शुभ्र असलेल्या या तूरच्या दाण्याची शेंग ही हिरवी आणि निळ्या शाईसारखी गडद पट्टीची असते़ नवापूर तालुक्यात सिंंचनाची व्यवस्था निर्माण झाल्यानंतर पारंपरिक तूर पीक हे नगदी पीक बनले़ नवापुरात उत्पादित करण्यात येणारी सुरती दाळ ही शेकडो वर्षांपासून लोकांची पसंती होती़ यातूनच मग देशी वाणाच्या निर्मितीसाठी प्रयत्न झाले़ हे सर्व होत असताना लागवड पद्धतीत बदल केले़ त्याला अतिरिक्त किंवा वाढीव खत देण्यापेक्षा त्यात सेंद्रीय खतांचा वापर केला़ सेंद्रीय पद्धतीनेच देशी तूर वाणाचा संगोपन करण्यात येत आहे़ पद्धत पारंपरिक असली, तरी विचार आधुनिक आहे़ हे येथील सर्व शेतकरी आत्मसात करू लागले आहेत़  -रशिद मोहन गावीत, तूर उत्पादक, धनराट़ता़ नवापूऱ सेंद्रीय तूर : नवापूर तालुक्यातील शेतकऱ्याची कमाल  आंतरपिकातून फुलवली देशी तूर