नागपूर : उपराजधानीतील विद्यार्थी चळवळीशी जुळलेल्या निधी कामदार यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘ओएसडी’ (आॅफिसर आॅन स्पेशल ड्युटी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे मुख्यमंत्र्यांचे ‘आयटी अफेअर्स’ व ‘सोशल मीडिया’ची जबाबदारी देण्यात आली आहे. निधी या भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षदेखील होत्या. समाजकारणात सक्रिय असलेल्या कामदार यांनी विद्यार्थ्यांचे बरेच प्रश्न हाताळले. याशिवाय ‘भाजयुमो’च्या सोशल मीडिया सेलच्या प्रमुख म्हणून देखील त्यांनी प्रभावी कार्य केले. प्रसिद्ध उद्योजक विपीन कामदार यांच्या त्या पुत्री असून त्यांचे आजोबा डॉ. एम. डी. कामदार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी बराच काळ जुळले होते. तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे प्रखर विरोधक म्हणून ते ओळखले जायचे संघाच्या विरुद्ध त्यांनी खटलादेखील लढविला होता. (प्रतिनिधी)
निधी कामदार मुख्यमंत्र्यांच्या ‘ओएसडी’
By admin | Published: November 20, 2014 2:35 AM