कोल्हापूर : राज्यातील नऊ सहकारी साखर कारखान्यांनी हंगाम सन २०१४-१५ मध्ये निर्यात केलेल्या साखरेच्या अनुदानापोटी एकुण एक कोटी रुपये शासनाकडून जमा झाले आहेत. सर्वाधिक ३० लाख ३९ हजारांचे अनुदान अहमदनगर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याला मिळणार आहे.हंगाम २०१४-१५ मध्ये राज्यात साखरेचे उत्पादन विक्रमी झाले होते. त्यावेळी देशातंर्गत बाजारपेठेत साखरेचे दर कमालीचे घसरल्याने सरकारने प्रतिटन एक हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. यापोटी दहा कोटी अनुदान सरकारला द्यावे लागत होते. त्यापैकी एप्रिल ते जून २०१७ मध्ये सात कोटी अनुदान संबंधित कारखान्यांना देण्यात आले आहेत. उर्वरित तीन कोटी अनुदान देण्याचा निर्णय वित्त विभागाने घेतला आहे़कारखान्याचे नाव मंजूर अनुदान रुपयेभाऊसाहेब थोरात (अहमदनगर) ३० लाख ३९ हजार ७४३शंकरराव मोहिते-पाटील (सोलापूर) ६ लाख १० हजार ९३०अगस्ती (अहमदनगर) २ लाख ५५ हजार ५०९छत्रपती शाहू (कोल्हापूर) १ लाख २१ हजार ६५१सह्याद्री (सातारा) ११ लाख ५१ हजार ४४२तात्यासाहेब कोरे (कोल्हापूर) १४ लाख १५ हजार ०७६पूर्णा (हिंगोली) ३ लाख ९ हजार ७९६माणगंगा (सांगली) ५ लाख ५० हजार २८५विठ्ठलराव शिंदे (सोलापूर) २३ लाख ४२ हजार ०८१
नऊ कारखान्यांना कोटीचे अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 5:58 AM