शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

राज्यात स्वाइनचे आणखी १0 बळी

By admin | Published: March 09, 2015 1:32 AM

राज्यात स्वाइन फ्लूचा विळखा आणखी घट्ट होत चालला असून, शनिवारी आणखी १० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे १ जानेवारीपासून

पुणे : राज्यात स्वाइन फ्लूचा विळखा आणखी घट्ट होत चालला असून, शनिवारी आणखी १० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे १ जानेवारीपासून शनिवारपर्यंतचा मृतांचा आकडा २११ वर गेला आहे. त्यामध्ये नागपूर शहरात स्वाइन फ्लूने सर्वाधिक ४६ जणांचा बळी गेला आहे. तसेच शनिवारी स्वाइन फ्लूचे ११५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात १ जानेवारीपासून शनिवारपर्यंत २ लाख ४१ हजार ३६८ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी २५ हजार १५० संशयित रुग्णांना औषध देण्यात आले आहे. शनिवारी ११५ नवीन रुग्ण आढळले असून, राज्यातील एकूण रुग्णांची संख्या २५०१ वर गेली आहे. विविध जिल्ह्यांत ३९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ३७ जण व्हेंटिलेटरवर आहेत. शनिवारी १५३ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. मृतांमध्ये नागपुरातील ४६, पुणे शहर व ग्रामीण भागातील ३४, लातूरमधील १३, नाशिकमधील ११ रुग्णांचा समावेश आहे. राज्यातील इतर भागांतही स्वाइन फ्लूचा फैलाव झाला असून, रुग्णांची संख्या वाढत आहे. मृतांमध्ये २० जण परराज्यातील असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली. या बाबत रूग्णांमध्ये जागृती करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)