शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

गडचिरोलीतील भूसुरुंग स्फोट; पोलीस उपअधीक्षक निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 2:19 AM

गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात महाराष्ट्र दिनी १ मे रोजी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १५ जवान हुतात्मा झाले.

मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात महाराष्ट्र दिनी १ मे रोजी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १५ जवान हुतात्मा झाले. याप्रकरणी जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक शैलेश काळे यांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल निलंबित करत असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केली.कुरखेडा येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या भुसुरुंग स्फोटात १५ पोलीस हुतात्मा झाले. नियमबाह्यपणे जवानांना उघड्या जीपमध्ये घटनास्थळी रवाना करण्याचा निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश गजभिये यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली. या चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री केसरकर म्हणाले की, कुरखेडा येथील नक्षली हल्लाचा सखोल चौकशी अहवाल प्राप्त झाला असून दोन दिवसांत यावर निर्णय घेत दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. कुरखेडा येथे जवानांचे पथक नेत असताना प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) अवलंबण्यात आली नसल्याचे अहवालातून समोर आले आहे. एसओपीचे पालन न करणाºयांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासनही केसरकर यांनी दिले.मात्र त्यांच्या उत्तरावर समाधान न झालेल्या विरोधकांनी अहवालावर ताबडतोब कारवाई करून दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी लावून धरली. अखेरीस केसरकरांनी गडचिरोलीच्या तत्कालीन पोलीस उपअधीक्षकांना निलंबित करत असल्याची घोषणा केली. तसेच या नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या वारसदाराला अर्ज केल्यानंतर सात दिवसांच्या आत नोकरी दिली जाईल, असेही त्यांनी आश्वस्त केले.शहरी भागातून नक्षल भरतीग्रामीण भागातून नक्षली पथकांत होणारी भरती पूर्णपणे थांबली आहे. तरी शहरी भागातून भरती सुरू असून गृह विभागाचे त्यावर बारीक लक्ष असल्याचा इशाराही केसरकर यांनी सविस्तर उत्तर देताना दिला. नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी राज्य सरकार आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहे. दीर्घकाळ हवेत राहणाºया ड्रोनचा वापर नक्षलींच्या बिमोडासाठी करण्यात येत आहे. संरक्षण संशोधन विकास संस्थेने तयार केलेल्या रोबोट तंत्रज्ञानाचा वापरही यासाठी केला जाणार असल्याचे केसरकरांनी सांगितले.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादी