शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

जीपीएसच्या मदतीने गाडीचोराला अटक

By admin | Published: July 05, 2017 5:24 AM

वाहनचालक म्हणून काम करायचे, नंतर तीच गाडी घेऊन लंपास व्हायचे आणि ती विकून टाकायची, अशी कार्यपद्धती असलेल्या एका

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वाहनचालक म्हणून काम करायचे, नंतर तीच गाडी घेऊन लंपास व्हायचे आणि ती विकून टाकायची, अशी कार्यपद्धती असलेल्या एका चोराच्या मुसक्या सोमवारी कांदिवली पोलिसांनी आवळल्या.सुनील जगमाल जापुदा उर्फ बिष्णोई (२०) असे अटक करण्यात आलेल्या या चोराचे नाव आहे. कांदिवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीलने कांदिवली पोलिसांच्या हद्दीतून एक टाटा सुमो गाडी लंपास केली होती. रिलायन्स कंपनीत काम करणाऱ्या अधिकाऱ्याने सुनीलला स्वत:कडे चालक म्हणून कामाला ठेवले होते. सुनीलने काही महिने ही गाडी चालविण्याचे काम केले. मात्र, नंतर त्याची नियत बदलली आणि कांदिवली पश्चिमच्या लिंक रोडवर असलेली गाडी सुनील घेऊन फरार झाला. ही बाब मालकाच्या लक्षात आली, तेव्हा त्याने जाऊन कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गाडीतील जीपीएस सीस्टिमच्या मदतीने कांदिवली पोलिसांनी त्याचे लोकेशन शोधले, जे गुजरात दाखवित होते. त्यानुसार, कारवाई करत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.साथीदारांचा शोध सुरूसुनील हा मूळचा राजस्थानच्या जल्लोर जिल्ह्यातील फडीपू राणीवाडा गावचा राहणारा आहे. त्याने यापूर्वीदेखील अशा प्रकारे गाड्यांची चोरी केल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र, या कामात तो एकटा नसून, अजून काही लोकांचा सहभाग असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यानुसार, या साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.