मुंबई : राज्यातील ७० टक्क्यांपेक्षा जास्त काम झालेल्या धरणांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन या सरकारने दिले होते; पण काहीच झालेले नाही. उलट, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील जलसंपदा विभागावर आपल्याकडे नाराजी व्यक्त केली आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.गडकरी राज्याला १ लाख कोटी रुपये देण्यास तयार होते. पण ते पैसे जलसंपदा खात्याऐवजी महामंडळाला देणार अशी त्यांची भूमिका होती. याचाच अर्थ गडकरींचा त्यांच्याच सरकारवर आणि मंत्र्यांवर विश्वास उरलेला नाही. मंत्रालयातून फोन गेल्याशिवाय केलेल्या कामांचे पैसे दिले जात नाहीत. राज्यात १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळ आहे, असेही ते म्हणाले.आठ महिन्याचे नियोजन करताना सर्व पक्षाच्या नेत्यांना विश्वासात घेऊन दुष्काळाचा सामना केला पाहिजे. तेलंगणा, आंध्रप्रदेश, केरळ व कर्नाटक या राज्यांनी केंद्राची नवीन दुष्काळ संहिता मान्य केली नाही, त्यांनी स्वत:चे नियम ठरवून मदत सुरु केली, याकडे पवार यांनी लक्ष वेधले.
स्वत: गडकरीही जलसंपदा विभागावर नाराज : अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 4:18 AM