शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

गडकरी-फडणवीसांच्या नेतृत्वाला कौल

By admin | Published: October 21, 2014 12:53 AM

लोकसभा निवडणुकीत नागपूरकरांनी भाजपला भरभरून साध दिली. त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळाली. १२ पैकी ११ जागा भाजपच्या झोळीत टाकत मतदारांनी भाजपचे

मतभेदांच्या अफवा : उत्तम समन्वयाने साधला विजयनागपूर : लोकसभा निवडणुकीत नागपूरकरांनी भाजपला भरभरून साध दिली. त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळाली. १२ पैकी ११ जागा भाजपच्या झोळीत टाकत मतदारांनी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला एकतर्फी कौल दिला. विशेष म्हणजे निवडणूक काळात कितीही अफवा उडाल्या तरी या दोन्ही नेत्यांमध्ये असलेल्या उत्तम समन्वयामुळे डाव साधल्या गेला. भाजपसमोर विधानसभा निवडणुकीचे मोठे आव्हान होते. त्यातही गडकरी-फडणवीस हे दोन्ही नेते नागपुरातील असल्याने नागपूरची कुठलीही जागा गमावून चालणार नव्हते. याची जाणीव या दोन्ही नेत्यांना असल्याचे निवडणुकीत पाहायला मिळाले. निवडणुकीत गडकरी व फडणवीस या दोन्ही नेत्यांच्या यंत्रणा काम करीत होत्या. मात्र, ही यंत्रणा कुणाच्याही एकमेकांच्या मार्गात आडवी आली नाही. उलट जेथे एक यंत्रणा कमी पडताना दिसली तेथे दुसरी यंत्रणा तत्काळ धावून गेली. दोन्ही नेत्यांमध्ये जबरदस्त समन्वय होता. विशेष म्हणजे शहर व जिल्ह्यातील बहुतांश तिकीट वाटप गडकरींच्या मनाने झाले. त्याला फडणवीसांची पूर्ण संमती होती. या नेत्यांमध्ये मतभेद असल्याच्या अफवा पसरविल्या गेल्या. त्यानंतरही ते विचलित झाले नाही. उलट अधिक समन्वयाने आव्हानाला सामोरे गेले. फडणवीस यांना राज्यात प्रचारासाठी फिरायचे होते. मतदारसंघात अधिक लक्ष देणे त्यांच्यासाठी शक्य नव्हते. अशा परिस्थितीत गडकरींची फौज दक्षिण-पश्चिममध्ये धावून गेली. या दोन्ही नेत्यांमधील समन्वयाचे उत्तम उदाहरण निवडणूक निकालानेच दिले. लोकसभेमध्ये गडकरींना दक्षिण-पश्चिममध्ये ६० हजारावर लीड होती, तर फडणवीस यांनादेखील त्याच्याच आसपास लीड मिळाली. राज्यात भाजपची सत्ता आणण्याचे या दोन्ही नेत्यांचे ध्येय होते. त्यामुळे प्रत्येक जागा जिंकणे आवश्यक होते. पश्चिम नागपुरात सुधाकर देशमुख अडचणीत असल्याचे लक्षात येताच, शेवटच्या तीन दिवसात या नेत्यांनी पक्षाचे कॅडर पश्चिममध्ये सक्रिय केले. खा. अजय संचेती यांच्यावर विशेष जबाबदारी सोपविण्यात आली. सर्वांना हाताशी धरून कामाला लावण्यात आले. दक्षिण नागपुरात सुधाकर कोहळे यांच्यासाठीही अशीच जबाबदारी पार पाडण्यात आली. त्याचा परिणामही दिसून आला. काटोल, हिंगणा, रामटेक या मतदारसंघातही दोन्ही नेत्यांनी विश्वासातील लोकांना कामी लावले. अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांशी या दोन्ही नेत्यांनी प्रत्यक्षात संवाद साधला. नाराजांना भविष्यात सामावून घेण्याचा विश्वास दिला, तर दुसऱ्या पक्षातील नाराजांना पक्षात घेत कामी लावण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. या समन्वयातूनच विजयाचा मार्ग सुकर झाला. (प्रतिनिधी)