नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ओएसडी म्हणून वावरणा-या एका ठकबाजाचा भंडाफोड झाला आहे. ‘जीसस वाघाडे’ असे त्याचे नाव असून त्याने गडकरी यांचा ओएसडी असल्याचे शासकीय मुद्रा असलेले व्हिजिटिंग कार्ड छापले होते. या कार्डचा वापर तो व्हीआयपी ठिकाणे व शासकीय कार्यालयांमध्ये सर्रासपणे करीत होता. गडकरी यांचे अतिरिक्त खासगी सचिव अतुल मंडलेकर यांच्या सतर्कतेमुळे या तोतया ओएसडीचा भंडाफोड झाला. अतुल मंडलेकर हे ३१ जुलै रोजी नागपूर विमानतळावरील गो-एअरवेजच्या काऊंटरवर बोर्डिंग पास घेत होते. त्याचवेळी तेथे वाघाडे आला. मंडलेकर यांनी हा प्रकार विमानतळावर उपस्थित सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास आणून दिला. कर्मचाºयांसमक्ष वाघाडे याची चौकशी करण्यात आली. गडकरी यांचे ओएसडी असल्याचे बनावट व्हिजिटिंग कार्ड वापरल्याची चूक झाल्याची कबुली दिली.
गडकरींच्या तोतया ओेएसडीचा भंडाफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 3:56 AM