शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

गायकवाडला पोलीस कोठडी

By admin | Published: April 04, 2017 4:31 AM

शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड याला सोमवारी कल्याण न्यायालयाने ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

कल्याण : शिवसेना नगरसेविका माधुरी काळे यांचे पती प्रशांत काळे यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेला शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड याला सोमवारी कल्याण न्यायालयाने ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. काळे यांच्यावर ८ मार्चला मध्यरात्रीच्या सुमारास काही जणांनी जीवघेणा हल्ला केला होता. पोलीस तेव्हापासून हल्लेखोरांचा शोध घेत होते. सीसीटीव्ही फुटेजद्वारे कोळसेवाडी पोलिसांनी २१ दिवसांनी प्रशांत बोटे, अनिल जगताप, प्रशांत काटलेकर यांना अटक केली. त्यानंतर, गायकवाड यालाही नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथून गजाआड केले. गायकवाड याचे एका शिवसेना पदाधिकारी असलेल्या बांधकाम व्यावसायिकाबरोबर अनेक वर्षांपासून वाद आहेत. याच व्यावसायिकाचे काळे यांच्याशीही वाद आहेत. त्यामुळे या संधीचा फायदा घेण्याचे गायकवाड याने ठरवले. त्यासाठी त्याने आपला मित्र प्रशांत यांच्यावर हल्ल्याचा डाव आखला होता. मात्र, मारेकरी सीसीटीव्हीत कैद झाले. त्यामुळे दुसऱ्याला अडकवण्यासाठी टाकलेल्या जाळ्यात तो स्वत:च अडकला.दरम्यान, अन्य आरोपी अनिल जगताप याची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात पोलिसांनी दाखल केले आहे. पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळेच मुलाची तब्येत बिघडल्याचा आरोप अनिलच्या कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, पोलिसांनी तो फेटाळून लावला आहे. कारागृहात त्याला चक्कर आल्यामुळे त्याला उपचारासाठी दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)>बाजारपेठ पोलीसही घेणार ताबा?कल्याण-डोंबिवली मुख्यालयात २५ मार्चला शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड आणि अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या समर्थकांमध्ये राडा झाला होता. याप्रकरणी या दोन्ही नगरसेवकांवर बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या चौकशीसाठी गायकवाड याचा ताबा बाजारपेठ पोलीस घेऊ शकतात, असे असे पोलीस सूत्रांनी सांगितले.