शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

गायरानाने राज्यभरात माजवले रान; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 12:16 PM

सरकार अधिगृहीत अशी जमीन ज्यावर जनावरे चरण्यासाठी, जळाऊ लाकडे मिळविण्यासाठी, स्मशानभूमी, सरकारी ऑफिसला देण्याकरिता राखीव असते. तिच्यावरचा ताबा किवा मालकी हक्क हा फक्त सरकारचा असतो.

सध्या राज्यात गायरान जमिनींवरील अतिक्रमणांचा मुद्दा गाजत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ‘सु मोटो’ जनहित याचिका दाखल करून घेत राज्यातील गायरान जमिनींबाबतचा तपशील महाराष्ट्र शासनाला मागितला. त्यात अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा झाल्यानंतर न्यायालयाने सर्व अतिक्रमणे चालू वर्षअखेरपर्यंत हटविण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता तहसीलदारांमार्फत अतिक्रमणधारकांना बांधकाम पाडण्याच्या नोटीस जारी करण्याचे सत्र सुरू झाले असून, मोठी खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर लोकमत चमूने घेतलेला हा खास आढावा....

गायरान जमीन म्हणजे काय? -सरकार अधिगृहीत अशी जमीन ज्यावर जनावरे चरण्यासाठी, जळाऊ लाकडे मिळविण्यासाठी, स्मशानभूमी, सरकारी ऑफिसला देण्याकरिता राखीव असते. तिच्यावरचा ताबा किवा मालकी हक्क हा फक्त सरकारचा असतो.

गायरान जमीन सरकारकडून भाडेतत्त्वावर मिळते. ती कुणाच्याही नावावर होत नाही. त्याची शासन दरबारी १ इ फॉर्मवर नोंद होते. म्हणजेच या जमिनीवर अतिक्रमण झाले, याची सरकार दप्तरी नोंद होते.

सर्वोच्च न्यायालयाने २०११ रोजी दिलेला आदेश -- ‘देशात अनेक जमिनी या सार्वजनिक स्वरूपाच्या असतात. गुरांना चरण्यासाठी, लहान मुलांना खेळण्यासाठी, स्मशानभूमीसाठी या जमिनी ग्रामपंचायतींच्या ताब्यात आहेत. परंतु, अनेक राज्यांत अशा जमिनी हडप केल्या जात आहेत. त्यामुळे सर्व राज्यांच्या सरकारांनी ग्रामपंचायतींच्या अखत्यारीतील जमिनींवर झालेली अतिक्रमणे तात्काळ काढावे. - याबाबत राज्यांच्या मुख्य सचिवांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे साह्य घ्यावे. कोणत्याही कारणाखाली कारवाई टाळू नये. - तसेच बेकायदा बांधकाम नियमित करू नये. केवळ अशा जमिनींवर शाळा, दवाखाना अथवा सार्वजनिक सेवा सुरू असल्यास किवा सरकारी अधिसूचनेद्वारे बेघरांना, अनुसूचित जाती-जमातीतील लोकांच्या बाबतीत बेकायदा ताबा नियमित करण्याचा विचार करावा.’

विभागनिहाय अतिक्रमण -विभाग    अतिक्रमणे    क्षेत्रफळ (हे.)कोकण    २३,९२३    ९५३ पुणे    ७६,९६९    ३,३७१नाशिक    १९,१५५     ६९६औरंगाबाद    ५४,१३३    २,४२०अमरावती    १८,५४१     ८१२नागपूर    २९,४३२    १,८३७(महाराष्ट्र शासनाने उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहिती)

विदर्भ -जिल्हा    गायरान    अतिक्रमित     संख्याअकोला     १२,५२१.७६     ३९.३४    ३,०१०अमरावती    ६,८२६     २४.२८    ३६०नागपूर    १,६४३.२९    ९.५५    १४८बुलढाणा    १८,१०६.५३    २४८.६६    १३,०१५चंद्रपूर    ५४०    ५३८    १,३९०गोंदिया    २४,६२९.२१    १,१२६.६६    २७,८५४यवतमाळ    ४९८.६९    ४९८.६९    - -भंडारा    १८.१८    ०    ०वाशिम    ४५,३३३.२०    ०    गडचिरोली    ०    ०    - -वर्धा    ०    ०    - -

उत्तर महाराष्ट्र -जिल्हा    गायरान    अतिक्रमित     संख्यानाशिक    १६१    १६१     - -जळगाव    - -    ९.८७    ७१६नंदुरबार    २,०००    - -    - -धुळे     - -    २७.८    १,८६८अहमदनगर    १७६३५.५८२    ४६१.९२७    ११५९२    

प. महाराष्ट्र, कोकण -जिल्हा    गायरान    अतिक्रमित     संख्याठाणे    २,२०९.३३    ६२४.२५    १२,६७६पालघर    ३०३९.२५    २१०.९९     ७,२६४रायगड    - -    - -    ३,९३५सिंधुदुर्ग    ३१५.६३     ०     ०सांगली    १०,४४६.६१    १०,०५१.१४    ११,४६८रत्नागिरी    ८५३.७८     ०.६१     ४८कोल्हापूर    २३ हजार    १,५००    २३,३४४सातारा     ८,८६२.९८    १०७.१२    १,७५८सोलापूर     - -    ९४७     २१,०००पुणे    १५,९०३.०५     ९९१.७६     १६,४७०

मराठवाडा -जिल्हा    गायरान    अतिक्रमित     संख्याजालना    २०,८७७.९७    ४,०८०    - -बीड    ४०,२७२    - -     - -परभणी    ३,५४०.३५    ८०.४३    २,०४०लातूर    ६,४९७.७२    ६९६.५१    २२,११९उस्मानाबाद    ४,९८४.४६    ७६.५७    १,५७२नांदेड    ४,३६०.३०    ३४०    २,०४४औरंगाबाद    ५३,५३९    १२,५००    ४१,२५०

(गायरान     आणि अतिक्रमित आकडेवारी हेक्टरमध्ये)

हायकोर्टाचे सरकारला निर्देशयापुढे कोणत्याही सरकारी प्रशासनाने किवा अधिकाऱ्याने अतिक्रमणे व बेकायदा बांधकामे नियमित करू नये. १२ जुलै २०११ पर्यंत १२ हजार ६५२ अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय कशाच्या आधारे घेतला त्याचे उत्तर चार आठवड्यांत द्यावे.दोन लाख २२ हजार १५३ अतिक्रमणे वर्षअखेरपर्यंत हटवण्याबाबतचा नेमका कृती आराखडा सादर करावा.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयState Governmentराज्य सरकारEnchroachmentअतिक्रमण