शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ

By admin | Published: July 22, 2016 12:52 AM

मनसेच्या वतीने कोंढवा खुर्द येथील पालिकेच्या संत गाडगेबाबा महाराज शाळेला कुलूप लावा आंदोलन करण्यात आले.

कोंढवा : विविध समस्यांच्या पूर्ततेसाठी मनसेच्या वतीने कोंढवा खुर्द येथील पालिकेच्या संत गाडगेबाबा महाराज शाळेला कुलूप लावा आंदोलन करण्यात आले.कोंढवा खुर्द प्रभाग क्र.६३ मधील महापालिकेच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या संत गाडगेमहाराज विद्यालयात मराठी, इंग्रजी आणि हिंदी माध्यमाची शाळा असून, या शाळेत जवळपास ३५०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. परंतु, या शाळेत विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी संख्येच्या प्रमाणात शिक्षक कमी आहेत. शिवाय, स्वच्छतागृह नेहमीच अस्वच्छ असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याने अनेक विद्यार्थी वर्गाबाहेर फिरत असतात. अशा अवस्थेत येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा हा प्रकार आहे. यासाठी शिक्षण मंडळाकडे निवेदन देण्यात आले. मात्र, तरीही याकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे मनसेच्या वतीने महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रभाग अध्यक्ष आरती बाबर यांच्या नेतृत्वाखाली शाळेला कुलूप लावा आंदोलन करण्यात आले.आंदोलनात रोहिणी रोकडे, सरिता सिरस, कलाबाई कामटे, पुष्पा शिंदे, रत्नप्रभा काळे, पारूबाई लोणकर, योगेश बाबर, सतीश शिंदे, माणिक ननावरे, अविनाश पवळे, अमित जगताप, सुदाम वांजळे, शेखर लोणकर, अजिंक्य ससाणे यांसह नागरिकांनी सहभाग घेतला. >मुलांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न असल्याने या समस्या त्वरित निवारण कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगरसेविका बाबर यांनी या वेळी दिला. तर, मुलांच्या मूलभूत शिक्षणाच्या हक्काकडे दुर्लक्ष करून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी शिक्षण मंडळ खेळ खेळत आहे, असा आरोप मनसेचे हडपसर विधानसभा अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी केला.