लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली असून, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना उत्सवासाठी मंडप उभारावे लागतात. हे मंडप उभारण्यासाठी पालिकेची परवानगी घेणे गरजेचे असते. परिणामी, मंडप उभारण्यासाठीची प्रक्रिया लवकर सुरू व्हावी यासाठी महापालिकाही सज्ज झाली असून, गणपती मंडप परवानगी अर्ज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, महानगरपालिकेने आयोजित केलेल्या ‘श्री गणेशोत्सव-२०१७’च्या पूर्वतयारी बैठकीमध्ये घोषित केल्याप्रमाणे जनसंपर्क विभागामार्फत प्रकाशित होणाऱ्या श्री गणेशोत्सव-२०१७च्या माहिती पुस्तिकेतील गणपती मंडप परवानगी व श्री गणेश गौरव स्पर्धेचा अर्ज पालिकेच्या संकेतस्थळावर ‘नवीन संदेश’मध्ये ‘अधिक नवीन काय’, ‘वृत्त व कार्यक्रम’ येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मंडळांनी या सुविधेचा लाभ घ्यावा; तसेच श्री गणेश गौरव स्पर्धेत जास्तीतजास्त श्री गणेश मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
गणपती मंडप अर्ज महापालिकेच्या संकेतस्थळावर
By admin | Published: July 12, 2017 2:00 AM