शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

गांधी घराण्याची गरीबी हटली; लोकांची नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 6:27 AM

उद्धव ठाकरे : राहुल गांधी, काँग्रेस-राष्ट्रवादीवर सडकून टीका

मुंबई : राहुल गांधी गरीबी हटावची घोषणा करताहेत. याआधी त्यांच्या आजीबार्इंनी याची सुरूवात केली होती. त्यांची गरीबी हटली, पण लोकांची नाही. काँग्रेस देशद्रोहाचे कलम हटवू पाहत आहे. हाच मोठा देशद्रोह आहे. हे कलम काढल्यास दाऊद येऊन काँग्रेसचा नेता बनेल, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

दक्षिण मध्य मुंबईचे शिवसेना उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचारासाठी महालक्ष्मी रेसकोर्सजवळ आयोजित सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. ते पुढे म्हणाले, देशद्रोह्यांना गोंजारणारे, क्रांतीकारकांना कायर म्हणणाऱ्यांच्या हाती देश देऊ नका. मी अमित शहांचा अर्ज भरायला गेलो, तर माझ्यावर टीका झाली. राष्ट्रवादीवाले म्हणतात, तुम्ही यांच्या शामियानात कसे? त्यांच्या पोटात का दुखतय? अरे याच तंबूत तुम्ही आधी झाडलोट करायला गेला होता, असा सवालही त्यांनी केला.

‘देवरांना महापौर बाळासाहेबांनी केलं’मिलिंद आमच्या अंगावर येताना जपून ये. तुझ्या वडिलांना ओळख माझ्या वडिलांनी दिली. बाळासाहेबांनी मुरली देवरा यांना महापौर केले नसते, तर आज मुंबईकरांना ते कोण? हे कदाचीत माहित नसते, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
मराठवाड्यातील जुलमी निजामाची राजवट संपविण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल खंबीरपणे पाठिशी राहिले. तसे इथल्या जनतेला आणि महाराष्ट्रातील सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठबळ द्यावे, असे आवाहन उद्घव ठाकरे यांनी केले. लातूर-उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्घव ठाकरे निवडणुकीच्या प्रचारसभेत पहिल्यांदाच औसा येथे मंगळवारी एकत्र आले. ठाकरे म्हणाले, भाजपने केलेला जाहीरनामा वाचून आनंद झाला. कलम ३७०, राममंदिर आणि शेतकरी हा केंद्रबिंदू मानला आहे. युती होण्याचे हेच कारण आहे.काँग्रेसचा जाहीरनामा मात्र थापा आहेत. राहुल यांच्या आजींपासून गरिबी हटावचा नारा सुरु आहे. त्यांची गरिबी हटली मात्र लोकांचे कायझाले, अशी टीका ठाकरे यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरुद्घ कठोर भूमिका घेतली. परंतु आमची अपेक्षा आहे, एकदाच काय तो घाव घाला. म्हणजे पाकिस्तान पुन्हा कुरापत काढणार नाही. तुम्ही राज्याच्या पाठिशी आहात, आणखी मजबुतीने आशीर्वाद द्या, कर्जमाफीतील जाचक अटी दूर करा. विमा कंपनीला वठणीवर आणा, असे ते म्हणाले.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाmumbai-north-central-pcमुंबई उत्तर मध्य