मुंबई : १९३१ साली एका पारशी पत्रकाराने महात्मा गांधीजींची मुलाखत घेतली होती. त्या वेळी घेतलेली त्यांच्या स्वाक्षरीचा २० हजारांत लिलाव करण्यात आला आहे. आज तोडीवाला लिलावगृहाने ९१वा लिलाव आयोजित केला होता. या लिलावात पुरातन काळातील पदके, नाणी, चलनी नोटा अशा ५२१ वस्तूंचा समावेश होता. या लिलावात महात्मा गांधींची स्वाक्षरी सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू होते.तसेच सम्राट अकबर, जहांगीर आणि शहाजहांन यांच्या काळातील अनेक चांदी आणि सोन्याची नाणी या लिलावात समाविष्ट करण्यात आली होती. ही नाणी ६ ते १० लाखांत विकली जाण्याची शक्यता होती. मात्र ७० ते ९० हजारांत ती विकली गेली. ही नाणी दिल्ली आणि आग्रा या ठिकाणांहून दक्षिण सुरत आणि हैद्राबाद अशा टाकसाळीत तयार केली होती. या लिलावात ५०० विविध नाणी, बॅँकांच्या चलनी नोटा आणि पदके, भारतीय नाणे परंपरेतील नाणी, हाताने पाडलेली नाणी यांचा समावेश आहे. २४०० वर्षांपूर्वींची चांदीची नाणी ३ हजार रुपयांना तर सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील १६०० वर्ष जुने सोन्याचे नाणे ५० हजारांना विकले गेले. (प्रतिनिधी)
गांधींची स्वाक्षरी २० हजारांत
By admin | Published: December 15, 2014 4:09 AM