Ganesh Chaturthi 2018; लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांनी घेतले गणरायाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 11:57 AM2018-09-18T11:57:25+5:302018-09-18T12:05:07+5:30

हिलटॉप येथील एकता गणेश मंडळाच्या श्री गणरायाचे सोमवारी लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी दर्शन घेतले.

Ganesh Chaturthi 2018; Lokmat Editorial Board Chairman, Former MP Vijay Darda took the view of Ganaraya | Ganesh Chaturthi 2018; लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांनी घेतले गणरायाचे दर्शन

Ganesh Chaturthi 2018; लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांनी घेतले गणरायाचे दर्शन

googlenewsNext
ठळक मुद्देनागपुरात राष्ट्रपती भवनाची प्रतिकृतीगणरायाला फुलेंची पगडीसर्वधर्मसमभाव अन् एकात्मतेची प्रेरणा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गणेशोत्सवात सर्वत्र आनंदी वातावरण असते. परंतु यासोबतच राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागावी. समाजात जातीय सलोखा वृद्धिंगत व्हावा, यासाठी सांस्कृतिक, धार्मिक व जनजागृतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विधायक कामही व्हावे या उद्देशाने गेल्या २८ वर्षापासून हिलटॉप, मुंजे बाबा आश्रम येथील एकता गणेश उत्सव मंडळाने बहुजन समाजातील युवकांनी आयएएस, आयपीएस अशा स्पर्धात्मक परीक्षेत सहभाग घ्यावा यासाठी ज्ञानमंदिर, विज्ञान मंदिरात गणेशाची स्थापना केली आहे. हिलटॉप येथील एकता गणेश मंडळाच्या श्री गणरायाचे सोमवारी लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, आ. प्रकाश गजभिये, उद्योजक धर्मेंद्र आहुजा उपस्थित होते. मंडळातर्फे दरवर्षी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, सैन्यातील वरिष्ठ अधिकारी, रेल्वे अधिकारी यांच्या मुलाखती व प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. सोबतच रक्तदान शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येते. विविध सामाजिक देखावे निर्माण केले जातात. सर्वधर्मसमभावाच्या संकल्पनेतून आंतरजातीय विवाहावर मान्यवरांच्या मार्गदर्शनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात.
यावर्षी हिलटॉप, मुंजे बाबा आश्रम येथे मंडळतर्फे भव्य १५१ फूट जागेत राष्ट्रपती भवनाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. इंडिया गेट व कुतूबमिनारची प्रतिकृ ती साकारली आहे. महात्मा फुले यांची पगडी घातलेली श्री गणेशाची मूर्ती स्थापित केली आहे.
फुले-शाहू- आंबेडकरांचे विचार राष्ट्रपती भवनापर्यंत पोहचावे असा हेतू यामागे आहे. सोबतच लालबागच्या धर्तीवर स्थापित केलेल्या वेगवेगळ्या आठ मूर्ती आकर्षणाचे केंद्र ठरल्या आहेत. मंडळाला यापूर्वी सामाजिक देखाव्यासाठी राज्य सरकार, वृत्त वाहिन्याकडून प्रथम क्र मांकाचे पारितोषिक मिळालेले आहे.

Web Title: Ganesh Chaturthi 2018; Lokmat Editorial Board Chairman, Former MP Vijay Darda took the view of Ganaraya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.