नवी मुंबई - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांना टोलमधून सूट देण्यात देण्यात येते. यासाठीचे पास वाहतूक विभागाकडून देण्यात येतात. परंतु या वर्षी अद्याप पासेस देण्यात येत नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. यामुळे गणेशभक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. तत्काळ पास देणे सुरू करावे, अशी मागणीही केली जात आहे. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. पश्चिम महाराष्ट्रातही मूळ गावी उत्सवासाठी हजारो चाकरमानी जातात. यामुळे एसटी व खासगी बसेसमध्ये जागा उपलब्ध होत नाही. यामुळे अनेक भाविक स्वत:ची खासगी गाडी घेऊन जातात. त्यांना शासनाच्या माध्यमातून टोलमधून सूट दिली जाते. प्रत्येक वर्षी उत्सवाच्या एक आठवडा अगोदर वाहतूक विभागाच्या माध्यमातून पासेस उपलब्ध करून दिले जातात. परंतु या वर्षी अद्याप पासेस देण्याचे काम सुरू झालेले नाही. रबाळेमधील काही नागरिकांनी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन चौकशी केली असता अद्याप काहीही सूचना आलेली नसल्याचे सांगण्यात आले.
Ganesh Chaturthi 2024: गणेशभक्तांना मिळेना टोलमुक्तीचा पास
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 07:47 IST