शहरं
Join us  
Trending Stories
1
"बासरीने काम चालणार नाही, सुदर्शन चक्र..."; असं का म्हणाले योगी आदित्यनाथ? कुणाचं नाव घेतलं?
2
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, लोकसभेत तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा
3
भाजपाने युती धर्म पाळला असता, तर शिंदेंचे चार खासदार वाढले असते -बच्चू कडू
4
अरविंद केजरीवालांच्या राजीनाम्याची वेळ ठरली? महत्त्वाची अपडेट
5
Arjun Tendulkar Video: Video: अर्जुन तेंडुलकरचा धमाका! ९ विकेट्स घेत फिरवला 'गेम'; संघाला मिळवून दिला विजय
6
एका एपिसोडसाठी लाखो रुपये घेते 'ही' ग्लॅमरस गर्ल; नेटवर्थ समजताच व्हाल हैराण
7
महायुतीचा जागावाटपाचा पेच संपला, ८० नाही, ९० नाही...; बावनकुळेंनी सांगितला नवा फॉर्म्युला
8
महाराष्ट्रासोबत दिल्लीतही मुदतपूर्व निवडणूक लागणार? आपची पहिली प्रतिक्रिया, काय आहेत नियम...
9
बँकांप्रमाणे LIC मध्येही होणार डिजिटल क्रांती; मोठ्या बदलासाठी Infosys कडे दिली जबाबदारी
10
PM मोदी गोंजारतायत ती अडीच फुटांची गाय कुठे मिळते? एक वेळ तर केवळ 100 च उरल्या होत्या; जाणून घ्या किंमत
11
"शिंदेजी, संजय गायकवाडला आवरा, नाहीतर...", नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा
12
'या' देशांमध्ये मिळतंय कवडीमोल भावात पेट्रोल; किंमत जाणून बसेल धक्का
13
राज्यात भाजपाला जमिनीचा कस लागेना? दिल्लीतून नेत्यांचे दौऱ्यांवर दौरे, काय चाललेय मनात...
14
टीम इंडियाला श्रीलंकेत रडवणाऱ्या Dunith Wellalage ला ICC कडून मिळाला खास सन्मान
15
पालकांसाठी अलर्ट! मुलांच्या हातात फोन देण्याचं योग्य वय काय, नेमका किती असावा स्क्रीन टायमिंग?
16
Amit Shah : "दहशतवादाला जमिनीत गाडून टाकू", अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
17
सई ताम्हणकरचा नॉन ग्लॅमरस लूक चर्चेत, लवकरच दिसणार वेगळ्या अंदाजात
18
Maharashtra Vidhan Sabha : बाळासाहेब थोरातांना सुजय विखे संगमनेरमधून देणार आव्हान!
19
SEBI चा यू-टर्न; 'कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचं निवारण चर्चेनंच होणार..,' 'ते' वक्तव्यही घेतलं मागे
20
मुंबईतील १ काँग्रेस आमदार फडणवीसांच्या 'सागर' बंगल्यावर; भेटीमुळे चर्चेला उधाण

Ganesh Mahotsav: जल्लोष बाप्पांच्या आगमनाचा, ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठा ब्रह्ममुहूर्तापासून सायंकाळपर्यंत!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2024 6:45 AM

Ganesh Chaturthi 2024: सर्वत्र आनंद, चैतन्य अन् मंगलमयतेची उधळण करणाऱ्या श्रीगणरायाचे शनिवारी आगमन होत असून, यंदाही लाडक्या बाप्पांच्या स्वागताची भक्तांनी जय्यत तयारी केली आहे.

पुणे - सर्वत्र आनंद, चैतन्य अन् मंगलमयतेची उधळण करणाऱ्या श्रीगणरायाचे शनिवारी आगमन होत असून, यंदाही लाडक्या बाप्पांच्या स्वागताची भक्तांनी जय्यत तयारी केली आहे. घरगुती उत्सवांसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सजविलेल्या दरबारात बाप्पा विराजमान होणार असल्याने शुक्रवारी दिवसभर महानगरांमधील बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होती. ‘गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष करीत बाप्पांचे रात्री उशिरापर्यंत मंडळात आगमन झाले.

ब्रह्ममुहूर्त पहाटे ४:५० ते दुपारी १:५१ - श्रीगणेश व्रत प्रतिष्ठापना पूजन शनिवारी (दि. ७) पहाटे ब्रह्ममुहूर्तापासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत, तसेच मुख्य चतुर्थी तिथी महत्त्वाची म्हणून सायंकाळपर्यंत करता येणार आहे. - ‘दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांच्या माहितीनुसार, शनिवारी भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे ४:५० ते दुपारी १:५१ पर्यंत ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठापना करता येईल. - सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना मध्यान्हनंतरदेखील करता येऊ शकते. 

यंदा गणेश चतुर्थी दि. ७ सप्टेंबरला असून, अनंत चतुदर्शी दि. १७  सप्टेंबरला आहे. त्यामुळे यंदाचा उत्सव अकरा दिवस साजरा करता येणार आहे. श्रीगणेशाची प्रतिष्ठापना आणि पूजन करण्यासाठी विशिष्ट नक्षत्र, वार, योग, विशिष्ट करण (भद्रा) तसेच राहुकाल, आदी वर्ज्य नाही. शिवालिखित आदी कोणतीही कोष्टके पाहण्याची गरज नाही. 

कशी कराल श्रीगणेश प्रतिष्ठापनाआपल्या सोयीनुसार घरच्या घरीदेखील श्रीगणेशाची पूजा करता येऊ शकते. गणेशाची मूर्ती मखरात ठेवावी, बसण्यासाठी आसन किंवा पाट घ्यावा. श्रीगणेशाचे पूजन करताना शुचिर्भूत असावे, घरात वादविवाद न करता प्रसन्नपणे सर्वांनी एकत्र असावे, अशी माहिती ज्योतिर्विद राहुल मुलमुले यांनी दिली.

देवाला काहीही समर्पण करत असताना ते उजव्या हातानेच वाहावे. मूर्तीवर पाणी, पंचामृत, अर्घ्य वाहताना फुलाने किंवा दुर्वांनी वाहावे. वडीलधाऱ्यांपैकी एकाने पूजा सांगावी. प्रथम कपाळी तिलक धारण करून आचमन करावे. देवापुढे बसून पूजेला प्रारंभ करावा. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः असा मंत्राेच्चार करावा. प्रत्येक नावाच्या शेवटी संध्येच्या पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन प्यावे. 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2024Ganeshotsavगणेशोत्सवMaharashtraमहाराष्ट्र